agriclture news in marathi,Red onion prices lower in Khandesh | Agrowon

खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत पोहोचले आहेत. किमान दर ५०० व कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

 

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत पोहोचले आहेत. किमान दर ५०० व कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

दरात मोठी घट गेल्या दोन दिवसांत झाली आहे. कांद्याची जळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०) ७०० क्विंटल आवक झाली. त्यात उन्हाळ कांद्याची अधिक आवक होती. तर पावसाळी किंवा खरिपातील लाल कांद्याची आवक कमी होती. परंतु या दोन्ही प्रकारच्या कांद्यांचे दर घसरले. खर्च वजा करता कुठलाही नफा शेतकऱ्यांच्या हाती राहत नसल्याची स्थिती आहे. एकरी २५ ते २८ हजार रुपये खर्च आला आहे. आणि उत्पादन आठ ते १० क्विंटल एवढेच आले आहे. त्यात खर्च व उत्पादन आणि उत्पन्न याचा कुठलाही ताळमेळ बसत नसल्याची स्थिती आहे. फक्त चार ते पाच हजार रुपये कांदा विक्रीतून हाती येत आहेत. अर्थात, एकरी २० ते २२ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पावसात कांद्याची मोठी हानी झालेली असतानादेखील दरात मोठी पडझड झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नीचांकी दर कमी आवक व उत्पादन असतानादेखील का आहेत, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

धुळे, पिंपळनेर येथेही दर कमीच आहेत. साक्री (जि. धुळे) तालुक्यातील शेतकरी आपला कांदा जळगाव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. पिंपळनेर बाजार समिती आठवड्यातून दोन दिवस बंद केली जात आहे. धुळे बाजार समितीदेखील आठवड्यातून दोनदा बंद केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कमी दर्जाच्या कांद्याचे लिलावच होत नाहीत. कांदा बाजार समितीमध्ये पडून राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यात आणखी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. जळगाव बाजार समितीत मोठी अनागोंदी सुरू आहे, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...