agriclture news in marathi,Representatives of the insurance company did not turn up for the crop inspection | Page 2 ||| Agrowon

पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाही 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व पांढराटाका रोगामुळे सलग दोन वर्ष भाताचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पीक पाहणीसाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत.

वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व पांढराटाका रोगामुळे सलग दोन वर्ष भाताचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले. यावर गेल्यावर्षी मोजक्या गावातील २ ते ५ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पीक पाहणीसाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत. ९५ टक्के शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. 

तालुक्यात भात हे मुख्य पीक घेतले जाते. चालूवर्षी भरपाईबाबत विमा कंपनी काहीही बोलायला तयार नाही. एरव्ही मतांसाठी नागरिकांना दंडवत घालणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. मागील व चालू वर्षी परतीच्या पावसाने ऐन भात सोंगणीवेळी थैमान घातले. पाच वर्षापासून पाऊस अनियमित पडतो. लागवडी दरम्यान पाऊस दडी मारतो, मात्र भात पक्वतेच्या अवस्थेत धो धो पडतो. परिणामी तयार झालेल्या पिकाचे नुकसान करतो. नेहमी होणाऱ्या नुकसानीला आधार मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पीक कर्ज वाढवून ‘भारत एक्सा’ या विमा कंपनीकडून पीक विमा घेतला. कंपनीने विमा घेतला तेव्हा कोणतेही मार्गदर्शन सूचना केल्या नाहीत. तालुक्यातील ७५ टक्के शेतकरी संगणक साक्षर नाहीत, त्यामुळे व विमा कंपनीने माहिती न दिल्यामुळे मुदतीत दावा दाखल केला नाही. 

विमा कंपनीचा प्रतिसाद नाही 
विमा कंपनीने दिललेल्या टोल फ्री नंबरवर तक्रार केली. इ- मेलवर नुकसान झालेल्या पिकांचे फोटो पाठवले. त्यावर विमा कंपनीने आमचे प्रतिनिधी येतील, ते नुकसानीची पाहणी करतील, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात कोणीही आले नाही. शेवटी पीक किती दिवस शेतात ठेवणार, शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला, तक्रारी दाखल केल्या, परंतु विमा कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे संप्तत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी व यावर्षी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाईच्या जाचक अटी रद्द करून  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी. 
-पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती,इगतपुरी. 

 


इतर बातम्या
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...