agriclture news in marathi,Solapur district will get stagnant subsidy for farms | Agrowon

सोलापूर जिल्ह्याला शेततळ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः जिल्ह्यातील ३३७४ शेततळ्यांचे १२ कोटी रुपये अनुदान थकीत होते.  उर्वरित ११ कोटी ३६ लाखांचे अनुदानही मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

सोलापूर ः राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतील जिल्ह्यातील ३३७४ शेततळ्यांचे १२ कोटी रुपये अनुदान थकीत होते. त्यापैकी चार कोटी २० लाख रुपये मिळाले होते. उर्वरित ११ कोटी ३६ लाखांचे अनुदानही मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

राज्य शासनाने नुकतंच या योजनेतील निधीस मंजुरी देऊन रखडलेले अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ३३७४ शेततळ्यांच्या प्रस्तावाचे १२ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी आमदार संजय शिंदे यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ३३७४ शेतकऱ्यांसाठी १६ कोटी ४८ लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी चार कोटी २० लाख रुपये अनुदान यापूर्वीच मिळाले आहे. आता उर्वरित ११ कोटी ३६ लाखांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे.

त्यात करमाळा तालुक्यात तीन कोटी ९३ लाख ४३१ रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. त्याशिवाय उर्वरित निधी दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, माढा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यातील शेतकऱ्यांनाही हे अनुदान मिळणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. 


इतर बातम्या
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू...