agriclture news in marathi,Solapur: Shut down Siddheshwar in four days | Agrowon

सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार दिवसांत बंद करा 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर उभारणे यासाठी पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाळप सुरू केल्याने कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन येत्या चार दिवसांमध्ये बंद करण्याचे आदेश विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहेत.

सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर उभारणे यासाठी पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाळप सुरू केल्याने कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन येत्या चार दिवसांमध्ये बंद करण्याचे आदेश विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहेत. त्याशिवाय वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पाच्या चिमणीमुळे विमानसेवेत अडथळा येत असल्याबाबत वाद सुरू आहे. स्थानिक प्रशासन ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. पण हा वाद काही केल्या शमत नाही. अलीकडेच नगरविकास खात्याने ही चिमणी पाडण्याबाबत अभिप्राय दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आले आहे. तसेच कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत महापालिकेतर्फे पत्रव्यवहार सुरू आहे. त्यातच आता कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्यासह, बॉयलर उभारणी, को-जनरेशनसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी कारखान्यास नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करण्याबाबत वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. 

पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष 
प्रदूषण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. कारखान्याने गाळपक्षमता अडीच हजार मेट्रिक टनांपेक्षाही जास्त केली. तसेच १० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला, उत्पादनक्षमतेच्या संमतीचे उल्लंघन केले. याबाबतच्या नियमिती करण्याबाबत यापूर्वी सातत्याने सूचना देऊनही कारखान्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.  
 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...