agriclture news in marathi,Solapur: Various fertilizer options for major rabi season crops | Agrowon

सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसाठी खतांचे विविध पर्याय 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आणि शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही, या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांसाठी विविध खताचे पर्याय दिले आहेत. 

सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व असंतुलितरीत्या वापर केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आणि शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही, परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होऊन, निव्वळ उत्पन्न कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांसाठी विविध खताचे पर्याय दिले आहेत. 

याबाबत कृषी विभागाने पत्रक काढून हे आवाहन केले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु शेतकऱ्यांना एकूणच पिकांकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची गरज भागाविण्याकरिता रासायनिक खतांचा वापर करीत असताना खतांची बाजारातील उपलब्धता, त्यांच्या सद्यःस्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च व कृषी विद्यापीठाच्या शिफाराशीनुसार खतमात्रा इ.बाबींचा विचार करणे गरजेचे असते. तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रकारचा वापर करण्याऐवजी बाजारातील विविध खतांची उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून तक्त्यातील नमूद पर्यायांचा अवलंब करावा. जेणेकरून ठरावीक खतांच्या अति वापरावरील ताण कमी होईल व बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या पर्यायी वापरास चालना मिळेल. या करिता कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार रब्बी हंगामातील प्रमुख पिकांकरिता विविध खतांचे संयोजन पर्याय सोबतच्या तक्त्यात देण्यात येत आहे, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

सविस्तर माहिती अॅपवर 
खतांच्या अधिक संयोजन पर्यायासाठी ‘‘कृषिक’’ या मोबाईल अॅपमधील खत गणकयंत्राचा वापर करावा. कृषिक ॲप डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details0id=com.rtc.krushik&hl=en या लिंकचा वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  

 
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...