शेतीपंपांची वीजतोडणी मोहीम थांबवा 

सोलापूर ः महावितरणकडून शेतीपंपांची वीजजोड तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, ती तातडीने मागे घ्यावी, अवाजवी बिले रद्द करावीत,यामागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
Stop the campaign of power cutting of agricultural power pump
Stop the campaign of power cutting of agricultural power pump

सोलापूर ः महावितरणकडून शेतीपंपांची वीजजोड तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, ती तातडीने मागे घ्यावी, अवाजवी बिले रद्द करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी भाजपच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी (ता.१५) आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जुनी मिल परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मागणीचे फलक घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा महावितरण कार्यालयावर दाखल झाला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर, भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, ‘‘युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांकडून वीजबिलाचा प्रश्‍न सुटत नसेल आणि त्यांचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एकेत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे,’’ असेही आमदार देशमुख म्हणाले.  या केल्या मागण्या 

-साखर कारखान्यांना ऊसबिलातून शेतकऱ्यांचे वीजबिल कपात करण्याचा आदेश रद्द व्हावा.  -दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे सौरऊर्जा योजनेत समाविष्ट करा.  -ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्याची वीजबिल भरण्याची सक्ती करू नये.  -अनधिकृत वीज कनेक्शनवर आधी आळा घालावा.  -कोरोना काळात भरमसाट बिले दिली, ती दुरुस्त करावीत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com