Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghumTarget of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum
Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghumTarget of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum

भडगाव, जि. जळगाव : ज्वारीसाठी भडगाव तालुक्याला ८ हजार ६४२ क्विंटलचे उद्दिष्ट 

भडगाव, जि. जळगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा सबमार्केट भडगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

भडगाव, जि. जळगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा सबमार्केट भडगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक व भडगाव पीपल बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांनी केला. जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक यांचा सत्कार संघाचे संचालक भीमराव पाटील यांनी केला. या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, नगराज पाटील, संघाचे व्हाइस चेअरमन सुभाष पाटील, भडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भैयासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. विशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.  भडगाव शेतकरी सहकारी संघात ज्वारीसाठी १५४, मक्यासाठी १६५ व बाजरीसाठी ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. तालुक्याला ज्वारी ८ हजार ६४२ क्विंटल, मका १२ हजार ४८२ क्विंटल, बाजरी ७२५ क्विंटलचे उद्दिष्ट दिलेले आहे. मक्यासाठी मर्यादा हेक्टरी १९.३९ क्विंटल, ज्वारीसाठी मर्यादा हेक्टरी १६.५ क्विंटल, बाजरी मर्यादा हेक्टरी ४.५२ प्रतिक्विंटल आहे. मक्याला १ हजार ८७० रुपये, ज्वारी २ हजार ७३८ रुपये व बाजरी २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. शासकीय भरडधान्य खरेदी करण्याचे प्रशासनाचे नियोजन केले असून बुधवार (ता. २९) पासून सुरू करण्यात आले आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्यात चर्चा झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com