agriclture news in marathi,The month-long agitation for Usbila is finally back off | Page 2 ||| Agrowon

सोलापूर : ऊसबिलासाठी महिन्यापासून सुरू असलेले  आंदोलन अखेरीस मागे 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊसबिलासाठी तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी (ता.२४) अखेर खात्यावर पैसे जमा केल्यानंतर मागे घेण्यात आले.

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊसबिलासाठी तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोलापुरातील काँग्रेस भवनासमोरील आंदोलन बुधवारी (ता.२४) अखेर खात्यावर पैसे जमा केल्यानंतर मागे घेण्यात आले. त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री कारखान्याने गेल्या वर्षीच्या ऊसबिलाचे पैसे न दिल्याने तुळजापूर तालुक्यातील शेतकरी अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून काँग्रेस भवनसमोर आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, राज्य साखर संघाकडे लेखी तक्रारी केल्या. पण दखल घेतली गेली नाही. या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनस्थळाला भेट देऊन लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. माजी आमदार म्हेत्रे हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट काँग्रेस भवन समोरच आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण ते फोल ठरले. कारण शेतकरी ऊसबिल जमा केल्याशिवाय उठायला तयार नव्हते. पण शेवटी अध्यक्ष म्हेत्रे यांनाच यात लक्ष घालावे लागले. या वेळी सुरेश हसापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आदी उपस्थित होते. 

साडेअकरा कोटी रुपये जमा 
कोणत्याही परिस्थितीत पैसे जमा केल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता. पण शेवटी कारखान्याला पैसे जमा करावे लागले. त्यानुसार आतापर्यंत ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेअकरा कोटी रुपये जमा केले आहेत. त्याची माहिती स्वतः म्हेत्रे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिली. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. 
 


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...