नाशिक: प्रस्तावित कृषी भवनामुळे कृषी कार्यालये येणार एक छताखाली 

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन कृषी विभागास अद्ययावत कृषी संकुल उभारणीसाठी मान्यता दिली आहे.
The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof
The proposed Krishi Bhavan will bring agriculture offices under one roof

नाशिक: जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली  कृषी विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रशासकीय दृष्टया व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे नाही. ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन कृषी विभागास अद्ययावत कृषी संकुल उभारणीसाठी मान्यता दिली आहे. 

सद्या भाड्याच्या जागेत कार्यरत कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर भाडे अदा करावे लागते. एकाच छताखालील अद्ययावत कृषि संकुल शहरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या परिसरातील शिंगाडा तलाव, गडकरी चौक येथील उपलब्ध जागेत प्रस्तावित आहे. येथे कृषी विभागाचे  ७२०३.९० चौ.मी.क्षेत्र असून या जागेवर शेतकऱ्यांच्या सुविधेकरीता तसेच कृषि विभागाची विविध कार्यालये आणि प्रयोगशाळा या करीता नव्याने इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. 

 प्रस्तावित इमारतीमध्ये नाशिक विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक तालुका कृषि अधिकारी, अन्नप्रक्रीया संचलनालय कार्यालय, मृदचाचणी व खतनियंत्रण प्रयोगशाळा, बैठक सभागृह, संगणक कक्ष आदी कार्यालये समाविष्ट आहेत.त्यामुळे शेतकरी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुविधा उपलब्ध होणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com