agriclture news in marathi,Wheat sowing in Khandesh gained momentum | Page 2 ||| Agrowon

खानदेशात गहू पेरणीला आला वेग 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे वातावरण आहे. यामुळे मशागतीसह पेरणीलाही वेग आला आहे. गहू पेरणी वेगात सुरू असून, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. 

जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे वातावरण आहे. यामुळे मशागतीसह पेरणीलाही वेग आला आहे. गहू पेरणी वेगात सुरू असून, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. 

१५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. ही पेरणी यंदा वाढेल. कारण जलसाठे मुबलक आहेत. गव्हाचे दरही गेल्या वर्षी टिकून होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे १६ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल. तर धुळे व नंदुरबारात मिळून ११ ते १२ हजार हेक्टरवर गहू पेरणी होईल. पेरणी सुमारे २० टक्के पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात वातावरण कोरडे राहिल्यास पेरणीला चांगला वेग येईल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात शहादा, तळोदा तालुक्यात गव्हाची अधिकची पेरणी यंदा होईल. पेरणीसाठी शेतकरी संकरित, घरात साठविलेल्या बियाण्यांचा वापर करीत आहेत. 

काळ्या कसदार जमिनीत गहू पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात पेरणी अधिक होईल. मध्यंतरी ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे पेरणी रखडली होती. परंतु ढगाळ वातावरण कमी झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) रात्री थंडीदेखील जाणवली. पुढे थंडी वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे गहू पेरणीला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. कापूस, जुनारी किंवा काढणी पूर्ण झालेली केळी, सोयाबीन आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गहू पेरणी होईल. यंदा पेरणी १०० टक्के होईल, असे संकेत असल्याने बाजारातूनही बियाण्यांना चांगला उठाव आहे. 

 


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...