येवला : संयुक्त खातेदारांचे अनुदानवाटप लांबणीवर

येवला : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालयाने सुमारे ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१ कोटींचे अनुदान वर्ग केले आहे.
Yeola: Distribution of grants to joint account holders on extension
Yeola: Distribution of grants to joint account holders on extension

येवला : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर तहसील कार्यालयाने सुमारे ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१ कोटींचे अनुदान वर्ग केले आहे. काही शेतकऱ्यांचे संयुक्त तथा सामाईक खाते असल्याने अशा शेतकऱ्यांचे अनुदान वर्ग करण्याला अडथळा येत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी संमतिपत्र व गरजेचे कागदपत्रे तत्काळ जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. संमतिपत्र न देणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा शासनाकडे जाऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. अवकाळी पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून, तब्बल आठवडाभर कपाशी, द्राक्ष, कांदे, भाजीपाला पिकात पाणी साचले होते. या पिकाचे पंचनामे करून महसूल व कृषी विभागाने अहवाल शासनाला पाठविला होता. त्यानुसार ४९ हजार २७६ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी सुमारे ५० कोटी ६९ लाखांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ४१ कोटी ४४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. ते पूर्णतः ३९ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. तर नऊ हजार ९३९ शेतकऱ्यांना अजून नऊ कोटी २५ लाख रुपये अनुदानवाटप बाकी आहे. या अनुदानाचीही मागणी करण्यात आली आहे. यात बहुतांशी संयुक्त व सामान्य खातेदारांची संख्या आहे. तालुक्यातील सर्व पात्र खातेदारांच्या याद्या तयार करण्यात येऊन बँक खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर अनुदानवाटप सुरू होईल. वैयक्तिक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. संयुक्त वा सामाईक खाते असलेल्या सर्व खातेदारांनी एका खातेदाराच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी संमतिपत्र देणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यातील शिल्लक असलेल्या संयुक्त व सामाईक खातेदार लाभार्थ्यांनी आजपावेतो तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांकडे संमतिपत्र दिलेले नाही. पहिल्या टप्प्यात आलेले ४१ कोटींचे अनुदान आम्ही तत्परतेने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही राहिलेले नऊ कोटी २५ लाखांचे अनुदान प्राप्त होताच तत्काळ बँक खात्यात वितरण करण्यात येईल. मात्र, यात संयुक्त व सामाईक खाते असलेल्या सर्व खातेदारांनी त्यापैकी एका खातेदाराच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी आपले संमतिपत्र करून द्यावे, अन्यथा हे अनुदान पुन्हा शासनाकडे परतही जाऊ शकते. - प्रमोद हिले , तहसीलदार, येवला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com