जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता 

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढली, तर एकूण १७ हजार बेडची व्यवस्था आहे. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरण प्रमाणपत्राशिवाय रेल्वे, बस, खासगी प्रवास नाकारण्यात येणार आहे.
Preparation of 17,000 beds in Jalgaon district
Preparation of 17,000 beds in Jalgaon district

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढली, तर एकूण १७ हजार बेडची व्यवस्था आहे. मोहाडी महिला रुग्णालयात ८०० बेडची व्यवस्था आहे. ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरण प्रमाणपत्राशिवाय रेल्वे, बस, खासगी प्रवास नाकारण्यात येणार आहे.  तिसरी लाट आली तर जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड केअर सेंटरची निर्मित करण्यात येईल. रुग्णांसाठी बेडही तयार आहेत. १७ हजार बेड आता उपलब्ध आहे. आयसीयू बेडची संख्या ११२७ आहे, तर ऑक्सिजन बेडची संख्या ४ हजारांवर आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांट २४ तयार आहेत. ऑक्सिजन लिक्विड प्लांट ९ असून, त्यातील ७ प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी पंधरा दिवसांत प्लांट सुरू करण्याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे.  तिसरी लाट लहान मुलांना बाधित करणारी असेल असा अंदाज आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा कक्ष सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ६७ टक्के आहे, तर दोन्हीही डोस घेतलेल्यांचे प्रमाण २७ टक्के आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.  संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तीच खरी लस आहे. गर्दीत जाणे टाळावे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्‍यक आहेत.  डॉ. एन. एस. चव्हाण , जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com