agriclture news in marath,Preparation of 17,000 beds in Jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढली, तर एकूण १७ हजार बेडची व्यवस्था आहे.  तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरण प्रमाणपत्राशिवाय रेल्वे, बस, खासगी प्रवास नाकारण्यात येणार आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढली, तर एकूण १७ हजार बेडची व्यवस्था आहे. मोहाडी महिला रुग्णालयात ८०० बेडची व्यवस्था आहे. ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरण प्रमाणपत्राशिवाय रेल्वे, बस, खासगी प्रवास नाकारण्यात येणार आहे. 

तिसरी लाट आली तर जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड केअर सेंटरची निर्मित करण्यात येईल. रुग्णांसाठी बेडही तयार आहेत. १७ हजार बेड आता उपलब्ध आहे. आयसीयू बेडची संख्या ११२७ आहे, तर ऑक्सिजन बेडची संख्या ४ हजारांवर आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांट २४ तयार आहेत. ऑक्सिजन लिक्विड प्लांट ९ असून, त्यातील ७ प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी पंधरा दिवसांत प्लांट सुरू करण्याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. 

तिसरी लाट लहान मुलांना बाधित करणारी असेल असा अंदाज आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा कक्ष सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ६७ टक्के आहे, तर दोन्हीही डोस घेतलेल्यांचे प्रमाण २७ टक्के आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तीच खरी लस आहे. गर्दीत जाणे टाळावे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्‍यक आहेत. 
डॉ. एन. एस. चव्हाण , जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...