बारामतीतील भेंडीची थेट युरोपात निर्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाची विक्री करण्यात शेतकऱ्यांपुढे प्रचंड समस्या उदभवल्या. पुणे जिल्ह्यातील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने अशा संकटात काळात आपल्या २७ सभासद शेतकऱ्यांकडील सुमारे दीड टन भेंडी युरोपात निर्यात करण्यात यश मिळवले आहे. केली आहे. स्थानिक बाजारपेठेत जिथे किलोला १२ रूपये दर सुरू होता, खरेदीला व्यापारी तयार नव्हते त्यावेळी आपल्या निर्यातक्षम भेंडीला प्रति किलो २५ दर रूपये दर मिळवण्यात हे शेतकरी यशस्वी झाले. संकटातही आर्थिक घडी सावरणे त्यांना शक्य झाले.
बारामतीतून निर्यात झालेली भेंडी
बारामतीतून निर्यात झालेली भेंडी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाची विक्री करण्यात शेतकऱ्यांपुढे प्रचंड समस्या उदभवल्या. पुणे जिल्ह्यातील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने अशा संकटात काळात आपल्या २७ सभासद शेतकऱ्यांकडील सुमारे दीड टन भेंडी युरोपात निर्यात करण्यात यश मिळवले आहे. केली आहे. स्थानिक बाजारपेठेत जिथे किलोला १२ रूपये दर सुरू होता, खरेदीला व्यापारी तयार नव्हते त्यावेळी आपल्या निर्यातक्षम भेंडीला प्रति किलो २५ दर रूपये दर मिळवण्यात हे शेतकरी यशस्वी झाले. संकटातही आर्थिक घडी सावरणे त्यांना शक्य झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी कार्यरत आहे. सन २०१५ मध्ये कंपनीची स्थापाना झाली आहे. या कंपनीतील शेतकऱ्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक अवशेशमुक्त शेती करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये मळद व निरावागज येथील २७ शेतकऱ्यानी मिळून २० एकरांवर भेंडीची लागवड केली आहे. भेंडी काढणीस आली त्यावेळी नेमके कोरोनाचे संकट व लॉकडाऊन सुरू झाला. मालाची काढणी, वाहतूक धोक्यात आली. निर्यातीची प्रक्रियाही अडचणीची झाली होती. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली व त्यांचे पथक प्रयत्नशील होते. मुंबई येथील एका निर्यातदार कंपनीसोबतही चर्चा सुरू होती. त्यंनीही चांगला प्रतिसाद दिला. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर भेंडचा पहिला कंटेनर २७ एप्रिल रोजी युरोपला रवाना झाला. आत्तापर्यंत एकूण दीड टन भेंडीची निर्यात झाली आहे.

बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद गुलाबराव वरे म्हणाले की सध्या जागतिक पातळीवर आलेले कोरोना संकट लक्षात घेता विक्री व्यवस्थेत व निर्यातीत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आम्हाला आता पुढची अडीच टनांची मागणी आहे. मात्र लवकरच युरोपला माल पाठविण्यातील सर्व अडचणी दूर होतील. लॉकडाऊनमध्ये स्थानिक बाजारपेठेत किलोला १२ रूपयांपर्यंत दर सुरू होता. मात्र निर्यातीत दुपट्ट दर मिळाल्याने भेंडीचे काय करायचे ही समस्या दूर झाली. वाहतूक व वितरण या प्रक्रियेत अडथळे आल्याने आमच्या कंपनीतील काही सदस्यांना मोठ्या प्रमाणात भेंडी मोफत वाटावी लागली होती. मोठे आर्थिक नुकसान ठरलेच होते. पण आम्ही निर्यात केल्याने आर्थिक घडी सावरणे शक्य झाले. आम्हाला दरवर्षी एकरी पाच ते साडेसात टनांपर्यंत भेंडीचे उत्पादन मिळते. या शेतीतून एकरी पावणेदोन लाख ते अडीच लाख रूपयांपर्यंतचे एकूण उत्पन्न मिळते. आम्ही अलिकडील वर्षांपासून भेंडीची मुंबई येथील कंपनीच्या साह्याने निर्यात सुरू केली आहे. यंदाही ती सुरळीत पार पडत आहे याचे समाधान आहे. या कंपनीतर्फे काही निविष्ठांचा पुरवठा व मदतही होते. आम्हाला केव्हीकेच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील यशवंत जगदाळे, तुषार जाधव व गिरीधर खरात यांचे मार्गदर्शन मिळत आहे. प्रल्हाद गुलाबराव वरे - ९८२२९००९११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com