agriculrural story, marathi, Farmer Sunil Darade is growing more than 25 types of vegetable crops in only six gunthas. | Agrowon

सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय भाजीपाला

मुकूंद पिंगळे
गुरुवार, 30 जुलै 2020

मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील सहा गुंठ्यात वर्षभर २५ हून अधिक प्रकारचा भाजीपाला पिकवण्यातून स्वयंपूर्ण झाले आहेत. इलेक्र्टीकल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या दराडे यांनी कुशलतेने वाफ्यांची रचना व वर्षभर पिके घेण्याचा आराखडा खुबीने बसविला आहे. सेंद्रिय व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादनाद्वारे कुटुंबाचे मानसिक व शारीरिक आरोग्य वृध्दींगत केले आहे.

मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील सहा गुंठ्यात वर्षभर २५ हून अधिक प्रकारचा भाजीपाला पिकवण्यातून स्वयंपूर्ण झाले आहेत. इलेक्र्टीकल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या दराडे यांनी कुशलतेने वाफ्यांची रचना व वर्षभर पिके घेण्याचा आराखडा खुबीने बसविला आहे. सेंद्रिय व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादनाद्वारे कुटुंबाचे मानसिक व शारीरिक आरोग्य वृध्दींगत केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील चापडगाव (ता.निफाड) या मूळ गावचे सुनील दराडे यांनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदविका घेतली. व्यवसायाने ते इलेक्र्टीकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. सन १९९८ पासून व्यवसायानिमित्त ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. गावाकडील वडिलोपार्जित शेतीकडेही दुर्लक्ष केले नाही. कांदा, ऊस, भाजीपाला, गहू व सोयाबीन, डाळिंब अशी पिके घेतली.

सहा गुंठ्यातील अनोखे मॉडेल
मखमलाबाद येथे घर परिसराचे नऊ गुंठे क्षेत्र आहे. पैकी ३ गुंठ्यात घर आहे. शेतीची आवड व प्रेम असल्याने उर्वरित सहा गुंठ्यात भाजीपाला पिकांचे मॉडेल साकारायचे ठरवले. त्यातून घराला वर्षभरासाठी लागणारा भाजीपाला पिकवायचा व स्वयंपूर्ण व्हायचे असे ठरवले.

काटेकोर व्यवस्थापन

 • संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती
 • सकाळी सहा वाजेपासून कामास सुरुवात. वाफे तयार करणे, लागवड करणे, जीवामृत, दशपर्णी अर्क तयार करणे अशा विविध जबाबदाऱ्यांमध्ये सुनील यांच्यासह पत्नी भारती, मुलगा प्रथमेश, मुलगी सुप्रभा यांचा सहभाग. आई इंदुमती यांचे मार्गदर्शन
 • टाकाऊ लोखंडाचा वापर करून १९ बेड्सची (वाफे) निर्मिती.
 • बेड अंतर (फूट) संख्या
 • ४ बाय ६.. १४
 • ६ बाय ६.. ३
 • ४ बाय १२.. २

ठळक बाबी

 • वर्षातून एकदा शेणखत व कंपोस्ट खत टाकून बेड भरले जातात.
 • नियोजनपूर्वक आखणी व उभारणीमुळे चहूबाजूने पाहणी करता येते.
 • पीक पायाखाली येऊ नये यासाठी चहूबाजूंनी मशागतीची व्यवस्था
 • -चिकट सापळे, कामगंध सापळे यांचा वापर
 • वेलवर्गीय भाज्यांसाठी स्वतंत्र मांडव
 • जीवामृत व दशपर्णी अर्काचा वापर.
 • किडी-रोग नियंत्रणासाठी लसूण, कांदा व लाल मिरची अर्क व नीम ऑइलचा वापर
 • पीक अवशेष व पालापाचोळा संकलित करून कंपोस्ट खतनिर्मिती

मानसिक व शारीरिक आरोग्य जपले
सकाळी लवकर उठून विविध पिकांमध्ये कामास सुरुवात केल्याने मानसिक आनंदासह शारीरिक श्रमांचा लाभ मिळतो. रसायन अवशेषमुक्त भाजीपाला असल्याने संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य जपले जाते.
ग्रामसमृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासोबत अनेक ठिकाणी भेटी, अभ्यासदौरे करून सुनील यांनी शेतीचे तंत्रज्ञान समजून घेतले. शिवाय यू ट्यूब चॅनेलवरूनही परदेशातील काही प्रयोग अभ्यासले. या प्रयत्नांची दखल घेऊन सुनील यांना ‘यशवंत कृषी गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

व्यवस्थापन वैशिष्ट्ये

 • विविध प्रकारच्या हंगामनिहाय भाजीपाला लागवडीसाठी बियाणे बँक
 • घरच्या घरीच रोपनिर्मिती
 • एका भाजीचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या बेडमध्ये लागवडीचे नियोजन
 • ठिबक, प्रवाही सिंचन व झारी पद्धतीने सिंचन
 • सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने रसायनांवरील खर्चात बचत
 • यांत्रिकीकरण व उपकरणांचा वापर करण्यावर भर

स्वयंपूर्णत मिळवली
दराडे यांचे पाच सदस्यांचे कुटुंब आहे. स्वतःच्या कुटुंबाला वर्षभर लागणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी आता बाहेर जाण्याची गरज त्यांना भासत नाही. शिल्लक भाजीपाला अन्य चार कुटुंबानाही देणे शक्य झाले आहे. त्यातून प्रति कुटुंबाकडून प्रतिमहिना तीनहजारांचे उत्पन्न मिळते. लॉकडाऊनच्या काळात देखील दररोज घरची ताजी भाजी उपलब्ध व्हायची. गुणवत्ता पाहून अनेक जणांकडून मागणीही व्हायची.

भाजीपाल्यातील विविधता

 • पालेभाज्या: मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, लाल माठ, कांदापात, अळू
 • फळभाज्या: भेंडी, कोबी, फ्लॉवर, गवार, वांगी( संकरित व देशी), टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, शेवगा
 • -कंदवर्गीय भाज्या: मुळा, बीटरूट, गाजर, हळद, बटाटा
 • -वेलवर्गीय भाज्या: कारले, भोपळे, गिलके, चवळी, डांगर, तोंडली, काकडी, दोडके, तोंडली, घेवडा, करटुले
 • परदेशी भाजीपाला: रेड कॅबेज, लेट्यूस, बेसील, चेरी टोमॅटो
 • कडधान्ये:उडीद, मूग
 • मसाले: तेजपान, ओवा, कढीपत्ता
 • फुले- देशी गुलाब (सफेद, लाल, गुलाबी), चार प्रकारचे जास्वंद व झेंडू, लिली, जाई, जुई,चाफा, ऑर्किड, कुंदा, मोगरा, पारिजात, पांढरा चाफा, चांदणी, सदाफुली, मखमल
 • फळे- आवळा, चिकू, पेरू, लिंबू, आंबा, हनुमान फळ, पपई, केळी
 • औषधी वनस्पती: कोरफड, अडुळसा, तुळस,
 • अन्य झाडे: आपटा, आरेका पाम, बॉटल पाम, अशोका बांबू

गोपालनाची जोड:
दोन देशी गीर गायींचे संगोपन केले आहे. स्वतंत्र गोठा, चारा उत्पादन, मुरघास व हायड्रोपोनिक्स युनिट आहे. दररोज सात लिटरपर्यंत दूध मिळते. घरातील आम्ही सर्व मंडळी सकाळी व संध्याकाळी देशी दूध सेवन करतो. त्याचे समाधान वेगळेच असते. शेणखत व गोमूत्राच्या वापरातून जमीन सुपीक केली आहे.

संपर्क- सुनील दराडे- ९४२११५३३९९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...