agricultrue news in marathi, lack of rainfall in buldhana district, maharashtra | Page 2 ||| Agrowon

बुलडाण्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अकोला  : पावसाळ्याचे दोन महिने उलटले असून, या कालावधीत अकोला-वाशीम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला अाहे. मात्र लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत पावसाने अपेक्षित सरासरीसुद्धा अोलांडलेली नाही. परिणामी या जिल्ह्यातील लाखो शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत सरासरी ३४४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४७ मिमी पाऊस झाला. हा पाऊसही असमान झालेला असून, कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे आहेत. परिणामी पाणीटंचाई कायम असून, पिकांची स्थितीसुद्धा जेमतेम अाहे.

अकोला  : पावसाळ्याचे दोन महिने उलटले असून, या कालावधीत अकोला-वाशीम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला अाहे. मात्र लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत पावसाने अपेक्षित सरासरीसुद्धा अोलांडलेली नाही. परिणामी या जिल्ह्यातील लाखो शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत सरासरी ३४४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४७ मिमी पाऊस झाला. हा पाऊसही असमान झालेला असून, कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे आहेत. परिणामी पाणीटंचाई कायम असून, पिकांची स्थितीसुद्धा जेमतेम अाहे.

खरिपाची सुरवात या वर्षी जोरात झाली. जून महिन्यातील पहिल्याच अाठवड्यात पाऊस झाल्यानंतर पेरण्या सुरू झाल्या. वऱ्हाडात यावर्षी चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित धरले जात होते. बुलडाण्याच्या तुलनेने अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला अाहे. त्यातही या वेळी वाशीम जिल्हा अग्रस्थानी अाहे. अकोल्यात अकोट, तेल्हारा हे तालुके अाजवर जेमतेम पावसाचेच राहलेले असून, तिकडे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम अाहे.

बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्यात ८६.५ मिमी (सरासरीच्या ६१ टक्के) तर जुलैत १६१.३ मिमी म्हणजेच सरासरी ७९.२ टक्के पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात जूनमध्ये १७७.१, जुलैत २७४ मिमी अाणि वाशीममध्ये जून महिन्यात २६८ तर जुलैत २४९ मिमी पाऊस झाला आहे.

बुलडाण्यात स्थिती बिकट
अातापर्यंत पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी बुलडाणा जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात तिळमात्र वाढ झालेली नाही. एेन पावसाळ्यात जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अाता पावसाळ्याच्या आगामी दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पिकांसह प्रकल्पांवर अाधारित असलेल्या पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसू शकतो. मागील वर्षात या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला होता. कमी पावसामुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू शकते.

अकोट, तेल्हाऱ्यात पावसाची गरज
अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र याच जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट हे दोन तालुके अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात पुरेशा पावसाअभावी केळीवेळी भागात काही शेतकऱ्यांनी अांतरपीक म्हणून लावलेली मूग, उडीद ही पिके वखरली अाहेत. पावसाची अशीच स्थिती राहली; तर तेथेही पाण्याची समस्या वाढू शकते.

वाशीममध्ये सर्वत्र समाधान
पाणीटंचाईला वर्षभर सामोरा गेलेल्या वाशीम जिल्ह्यात या मोसमातील दोन महिने चांगल्या पावसाचे राहिले अाहेत. दमदार पावसामुळे असंख्य प्रकल्प तुडुंब भरून वाहत अाहेत. या जिल्ह्यात पिकांची स्थितीसुद्धा अातापर्यंत चांगली अाहे.  
 

पाऊस स्थिती (मिमी)
जिल्हा  अपेक्षित पाऊस  पडलेला पाऊस
बुलडाणा  ३९९.८ २४७.५
अकोला ३६६ ४५१
वाशीम  ४२२ ५१७

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर...नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी...
नाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गोसेखुर्द प्रकल्पासाठी भूसंपादनाचा तिढा...नागपूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान...
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव...बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या...
राज्यात कृषी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया...पुणे ः राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...