agricultur news in marathi, Nirav Modi arrested in london | Agrowon

बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी जाळ्यात
वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक करून फरारी झालेला नीरव मोदी (वय ४८) याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारी (ता. २०) लंडनमध्ये अटक केली. बॅंकेला गंडा घालणाऱ्या मोदी याला अटक करण्यात येथील मेट्रो बॅंकेच्या कर्मचाऱ्याची हुशारी कामी आली, हा एक प्रकारचा योगायोगच आहे.

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक करून फरारी झालेला नीरव मोदी (वय ४८) याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारी (ता. २०) लंडनमध्ये अटक केली. बॅंकेला गंडा घालणाऱ्या मोदी याला अटक करण्यात येथील मेट्रो बॅंकेच्या कर्मचाऱ्याची हुशारी कामी आली, हा एक प्रकारचा योगायोगच आहे.

नीरव मोदी मेट्रो बॅंकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. त्या वेळी बॅंक कर्मचारी टेलर याने त्याला ओळखले व सावधानता बाळगत स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कळविले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बॅंकेत पोचून त्याला ताब्यात घेतले. नीरव मोदी हा २५ मार्च रोजी पोलिसांना शरण येणार होता. त्याच्या वकिलांनी तसे जाहीर केले होते. पण त्यापूर्वीच तो पकडला गेल्याने वकिलांनाही धक्का बसला आहे. वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने काल जामीन नाकारल्याने त्याला २९ मार्चपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. आता नीरव मोदी याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा अब्रुथनॉट यांच्या समोर होणार आहे. फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याचा खटल्याचेही कामकाज त्यांनीच पाहिले आहे.

अटक होण्यापूर्वी नीरव मोदी वेस्टएंडमधील आलिशान घरात राहत होता. आता त्याची रवानगी इंग्लंडमधील सर्वांत दाटीवाटी असलेल्या "हर मॅजेस्टीज प्रीझन (एचएमपी) वॅंड्‌सवर्थ' या तुरुंगात करण्यात आली आहे. येथील माध्यमांच्या दाव्यानुसार या तुरुंगात अंडरवर्ल्ड डॉन दावूद इब्राहिम याचा पाकिस्तानमधील साथीदार जबीर मोती हाही कैदेत आहे. मोदी याच्या प्रत्यार्पण प्रकरणावरील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे.

असे आहे 'एचएमपी वॅंड्‌सवर्थ'

  • 'ब'दर्जाचे कारागृह
  • उच्च दर्जाची सुरक्षा जोखीम नसलेल्या गुन्हेगारांची रवानगी
  • मार्च २०१८मधील अहवालानुसार तुरुंगातील पुरुष कैद्यांची संख्या एक हजार ४२८
  • इंग्लंड व वेल्समधील सर्वाधिक गर्दी असलेला तुरुंग
  • अमली पदार्थ व मानसिक आरोग्याशी संबंधित कैदी जास्त
  • एका रुग्णाच्या जागी दोन कैद्यांची भरती
  • पुरेशा प्रसाधनगृहांचा अभाव
  • कोठडीतून बाहेर येण्यास कमी कालावधी

मोदीच्या मोटारी व चित्रांचा लवकरच लिलाव
नवी दिल्ली :
‘पीएनबी' बॅंकेची १३ हजार कोटी रुपयांची फसणूक करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालकीची १७३ चित्रे व ११ मोटारींचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) बुधवारी (ता. २०) परवनागी दिली. नीरव मोदी याच्या मालकीच्या १७३ चित्रांची किंमत ५७.७२ कोटी आहे. तसेच त्याच्याकडे रोल्स रॉईस, पोर्शे, मर्सिडिस व टोयोटा फॉच्युनर अशा महागड्या ११ मोटारी आहेत. पुढील महिन्यात याचा लिलाव होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बनावट हिरे विक्रीच्या स्वतंत्र गुन्हाच्या चौकशीत प्राप्तिकर विभागाने नीरव मोदी याची आणखी ६८ चित्रे जप्त केली असून, त्यांचाही लिलाव करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याची माहिती "ईडी'च्या अधिकाऱ्यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...