कॅमेरा ठेवतो पिकावर नजर

कॅमेरा ठेवतो पिकावर नजर
कॅमेरा ठेवतो पिकावर नजर

हरितगृहातील पिकांच्या वाढीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्यांनी आता कॅमेराचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

या तंत्रज्ञानामध्ये कॅमेरा तसेच संगणकप्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हा कॅमेरा हरितगृहाच्या आतल्या बाजूला बसविलेला आहे. या कॅमेरा अतिशय सूक्ष्म छायाचित्रण करतो. त्याचबरोबरीने या कॅमेराच्या माध्यमातून पीकवाढीतील प्रत्येक टप्प्यांचे चित्रण होते. त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल केले जातात. पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यातील छायाचित्र मिळत असल्याने तज्ज्ञांना वनस्पतीच्या वाढीचा नेमकेपणाने अभ्यास करता येणार आहे. त्यानुसार उत्पादनवाढीसाठी विशेष उपाययोजना करणे शक्य होईल. यामध्ये जमा झालेल्या चित्रणाचा उपयोग संशोधनासाठी होणार आहे. ही जमा झालेली माहिती संबंधित तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com