पीक सल्ला

भुईमुगाची गादीवाफ्यावर लागवड
भुईमुगाची गादीवाफ्यावर लागवड

कपाशी : कपाशीची फरदड घेण्याचे टाळावे. काढलेल्या पऱ्हाटी जाळून नष्ट कराव्यात. रब्बी ज्वारी : जमिनीत ओलावा कमी झाल्यास तसेच पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे. करडई :

  • बागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जमिनीला भेगा पडण्याच्या अगोदर हलके पाणी द्यावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो एक आड एक सरी पाणी द्यावे. .
  • मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के) १.३ मि.लि. किंवा अॅसिफेट (७५ टक्के) १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • हरभरा :

  • हरभरा पिकास ज्या ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला असेल तेथे सिंचन करावे. पीक फुलाेरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास हलके पाणी द्यावे.
  • घाटेअळीची आर्थिक नुकसान पातळी बघण्यासाठी प्रतिएकरी दोन कामगंध सापळे लावावेत.
  • घाटेअळीच्या व्यवस्थापनाकरीता एकरी वीस या प्रमाणात इंग्रजी ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे ठिकठिकाणी शेतात उभे करावेत.
  • घाटे अळीचा नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर इमामेक्टीन बेंझोएट ०.५४ ग्रॅम किंवा क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.२५ मि.लि.
  • सूर्यफूल :

  • पिकाची निंदणी, कोळपणी करून पीक स्वच्छ ठेवावे.
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे निंबोळी पेंडीत मिसळून द्यावे.
  • पिकास बाेंडे लागणे, फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • पाने खाणारी अळी तसेच केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अंडीपुंज व अळ्यांची जाळी असलेली पाने तोडून गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत.
  • पाने खाणारी/ केसाळ अळी रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर सायपरमेथ्रीन (१० टक्के इ.सी.) १ मि.लि. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.
  • उन्हाळी भुईमूग :

  • लागवडीसाठी टी.ए.जी.-२४, टी.जी. -२६, टीएलजी-४५, टीजी -५१, टीपीजी -४१, टीजी-३७ किंवा एसबी-११ या जातींची निवड करावी.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे त्यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी)२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व त्यानंतर जिवाणू खतांची करावी.
  • पेरणीसाठी प्रतिहेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
  • रासायनिक खते :  पेरणीवेळी प्रतिहेक्टरी नत्र २५ किलो, स्फुरद ५० किलो पेरुन द्यावे. जमिनीत पालाश व गंधकाची कमतरता असल्यास पेरणीवेळीच पालाश ५० किलो व गंधक २० किलो प्रतिहेक्टरी द्यावे. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॅास्फेटद्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा (१२ टक्के) भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो. पेरणी : प्रथम रान ओलावून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी करावी. तिफणीने पेरणी करून उपट्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व निम पसऱ्या जातींसाठी ४५ सें.मी. ठेवावे. पाणी व्यवस्थापन : पेरणी नंतर त्वरित सारा यंत्राच्या साह्याने पिकास पाणी देण्यासाठी सारे पाडावे. नंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात. डी.डी. पटाईत, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com