निर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...

निर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...
निर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...

पॉलिहाउसमधील गुलाब उत्पादन शेतकरी ः ज्ञानेश्वर ठाकर पॉलिहाउस क्षेत्र ः ५६ गुंठे. मु. येळसे, पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे. मावळ तालुक्यातील येळसे (जि. पुणे) येथील ज्ञानेश्वर ठाकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. महाविद्यालयामध्ये असताना दिलीप भिलारे यांच्यासोबत ओळख झाली. ते फुलांच्या कंपनीत काम करत. फूलशेती शिकण्याच्या दृष्टीने कॉलेज सुरू असतानाच या कंपनीत काम करण्यास सुरवात केली. नंतर स्वतःची नर्सरी उभी करण्याचा निर्णय घेतला. भांडवल कमी असल्याने गुलाबाचे मातृवृक्ष लावत तयारी केली. त्यातून १९९७ साली गुलाबाची ५००० रोपे बनवली. मात्र, विक्री करण्यामध्ये अडचणी तोटा झाला. मारुती दळवी यांच्या सहकार्याने कशीबशी ती रोपे खपवली. नंतर गुलाब रोपेनिर्मिती आणि विक्रीचा व्यवसायात जम बसू लागला. याच काळात फूलशेती करणारा भाऊ मुकुंद ठाकर यांच्यासह पॉलिहाउस उभारणीचा निर्णय घेतला. पूर्वपरवानगी घेतली तरी दहा गुंठे पॉलिहाउससाठी दहा लाख रुपये गुंतवणूक शक्य नसल्याने माघार घेतली. बंधूंचे पॉलिहाउस मात्र सुरू झाले. वाढते आज दहा एकरपर्यंत पोचले आहे. त्याने पुन्हा प्रोत्साहन देत रागे भरल्याने २०१४-१५ मध्ये एकदम ५६ गुंठे पॉलिहाउस केले. या अनेकांची मदत झाली. गुलाबाची बोर्डेक्स जातीची लागवड केली. सुरवातीला एका मार्गदर्शकाची मदत घेतली. मात्र, आता पत्नी मनीषासह ज्ञानेश्वर स्वतःच संपूर्ण हरितगृहाचे नियोजन करतात.

  • सुरवातीला अधिक असलेली मजुरांची संख्या आता कमी केली असून, मजुरीवरील प्रतिमहिना खर्च ४५ हजार रुपयांपर्यंत कमी केला आहे. खर्चामध्ये बचत ही नफ्यामध्ये वाढीसाठी उपयुक्त ठरली आहे.
  • गेल्या वर्षी २२ लाख फुलांचे उत्पादन घेतले.
  • आतापर्यंत बॅंकेकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेपैकी अर्धे फेडले आहे. आणखी दोन एकर क्षेत्र वाढवण्याचे नियोजन करत आहेत.
  • संपूर्ण पॉलिहाउसमध्ये पिकांची देखरेख आणि वेळेवर काम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोज चार तास पॉलिहाउसमध्ये देखरेख स्वतः करतात. त्यानंतर पूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पत्नी मनीषा कामे करून घेतात.
  • दर वर्षाचे महत्त्वाचे भारतीय सण (गणपती, दिवाळी, दसरा व अन्य) आणि परदेशी सण (नाताळ, व्हॅलेंटाइन डे, मदर्स डे इ.) यांच्या तारखा पाहून त्यानुसार फुले उत्पादनाचे नियोजन करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी वेळेवर छाटणी घेणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घेतली जाते.
  • निर्यातक्षम फुलांचे उत्पादन अत्यंत महत्त्वाचे असून, त्यावर फूलशेतीचे संपूर्ण आर्थिक गणित विसंबून असते. गेल्या काही वर्षापासून मुकुंद ठाकर यांच्या गटामध्ये समाविष्ट असून, गटाद्वारे फुलांची निर्यात केली जाते.
  • दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी खतांचा संतुलित वापर केला जातो. खतानुसार ए आणि बी टाक्या बनवून त्या ठिबकद्वारे दिल्या जातात.
  • कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फवारणी करण्याऐवजी प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन असते. आठवड्यामध्ये दोन ते तीन फवारण्या होतात. त्यामध्ये बुरशीनाशक, कीडनाशक आणि विद्राव्य खतांचा समावेश असतो.
  • संपर्क ः ज्ञानेश्वर ठाकर, ९८२३७८०९९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com