शरीरात औषधे त्वरित पोचवण्यासाठी एलईडी ठरेल उपयुक्त

शरीरात औषधे त्वरित पोचवण्यासाठी एलईडी ठरेल उपयुक्त
शरीरात औषधे त्वरित पोचवण्यासाठी एलईडी ठरेल उपयुक्त

एलईडी दिव्यांचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसह विविध क्षेत्रांमध्ये वाढत आहे. प्रिन्सटन विद्यापीठामध्ये या प्रकाशांच्या साह्याने किरणत्सारीत मूलद्रव्यांची निर्मिती करून औषधे रुग्णांच्या शरीरामध्ये देण्याचे नव तंत्रज्ञान शोधण्यात आले आहे. पूर्वी औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होण्यासाठी काही महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत असे. मात्र, या नव्या पद्धतीमध्ये फोटोकॅटॅलिस्टिक प्रक्रियेने काही तासांतच हायड्रोजनची जागा ट्रिटियमने घेणे शक्य झाले आहे . वास्तविक पाहता किरणोत्सारी घटकांचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. मात्र, वैद्यकीय कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या किरणोत्सारीतेचा वापर करून औषधे शरीरामध्ये योग्य ठिकाणी पोचवण्याची नावीन्यपूर्ण पद्धती प्रिन्सटन विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्रा. डेव्हिड मॅकमिलन यांनी विकसित केली आहे. त्याविषयी माहिती देताना प्रा. मॅकमिलन म्हणाले, की संशोधनानंतर औषधे बाजारपेठांमध्ये येण्याचा सरासरी कालावधी हा १२ ते १४ वर्षे इतका मोठा आहे. कारण त्यांच्या चाचण्या घेताना लागणारा कालावधी मोठा आहे. हा कालावधी कमी करणे नव्या तंत्रामुळे शक्य होणार आहे. परिणामी औषधांची उपलब्धताही वेगाने होऊ शकेल. कारण तोंडावाटे घेतलेले औषध लक्ष्य असलेल्या अवयवापर्यंत पोचण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात ते नेमके लक्ष्य असलेल्या अवयवापर्यंत जाते की नाही, परिणाम करते की नाही, याच्या सातत्याने चाचण्या घ्याव्या लागतात. या औषधी मूलद्रव्यासह किरणोत्सारीत घटक असल्यास त्यांचा मागोवा घेणेही अत्यंत सोपे जाते. किरणोत्साराचा धोका कमी करण्यासाठी... अर्थात, या तंत्रामध्ये किरणोत्सारी घटकांचा वापर केलेला असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळापर्यंत रुग्णांच्या शरीरात राहू शकतो. या धोक्यावर मात करण्यासाठी प्रा. मॅकमिलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निळ्या प्रकाशाच्या एलईडी दिवा आणि त्यावर कार्यान्वित होणाऱ्या घटकांचा आधार घेत नवी पद्धती तयार केली. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात जड पाण्याचा वापर केला असून, त्यातील एच किंवा हायड्रोजन मूलद्रव्याची जागा ट्रिटियम घेते. यामध्ये प्रकाश मदत करतो. ही प्रक्रिया सर्व प्रकारच्या औषधांसाठी उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com