बेदाणा तारण कर्ज योजना

बेदाणा तारण कर्ज योजना
बेदाणा तारण कर्ज योजना

 ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहेत त्यांना पूर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर प्रत्यक्षात तारण ठेवण्यात आलेल्या बेदाणा या शेतीमालाच्या प्रचलित बाजार भावाच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम इतके कर्ज अग्रीम रक्कम ६ टक्के व्याज दराने सहा महिन्यांचे (१८० दिवस) मुदतीकरिता अदा करण्यात येईल.

  •  शीतगृहामध्ये ठेवण्यात येणाऱ्या बेदाण्याचा दर्जा व त्याचा ताबा आदि बाबत बाजार समितीने पूर्ण दक्षता घेऊन प्रचलित बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांचे मुदतीने ६ टक्के व्याजदराने संबंधीत शेतकऱ्यास अदा करावी.
  •  कोणत्याही परिस्थितीत बेदाण्याचा प्रतिकिलो दर हा  १०० रुपयांच्या पेक्षा जास्त विचारात घेऊ नये.
  •  या योजनेअंतर्गत छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून प्रति शेतकरी जास्तीत जास्त ५० क्विंटल एवढ्या शेतीमालाचा तारणात स्वीकार करण्यात यावा.
  •  बेदाणा या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणाऱ्या बाजार समितीस कमाल पाच काेटीपर्यंत तारण कर्ज देता येईल व सदर तारण कर्जावर ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल.
  •  सदर शेतीमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी शीतगृह प्रमुखावर राहील, असा विमा उतरविणाऱ्या शीतगृहाचीच बाजार समितीने या योजनेसाठी निवड करावी.
  •  शीतगृहामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मालाची साठवणूक करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.
  • दृष्टिक्षेपात बेदाणातारण याेजना

  •  सांगली बाजार समितीमध्ये गेल्या २०१६-१७  व चालू हंगामात २०१७-१८ मध्ये बाजार समित्यांनी बेदाणा तारण याेजनेअंतर्गत १४४.३० क्विंटल आणि १३०.९५ क्विंटल बेदाणा तारण ठेवण्यात आला. या तारणावर अनुक्रमे ७ लाख ५० हजार आणि ५ लाख ५१ हजार रुपये कर्जवाटप करण्यात आले.
  •  तासगाव बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये १८३३.०३ क्विंटल  बेदाणा तारण ठेऊन त्यावर १ काेटी १० लाख ७५ हजार रुपये कर्जवाटप करण्यात आले.
  • संपर्क ः  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे  टोल फ्री क्रमांक ः १८००-२३३-०२४४, ०२०-२४५२८१००, २००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com