फिरत्या दिव्याने रोखली रानडुकरे!

फिरत्या दिव्याने रोखली रानडुकरे!
फिरत्या दिव्याने रोखली रानडुकरे!

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असले तरी तुलनेने योग्य नुकसानभरपाई कधीच मिळत नाही. वन्यप्राण्यांना त्यातही रानडुकरांना प्रतिबंध करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील चितलवाडी (ता. तेल्हारा) येथील विजय इंगळे यांनी नामी उपाय शोधला आहे. केवळ सातशे रुपये खर्चामध्ये फिरत्या तेजस्वी दिव्याच्या साह्याने पिकाचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे. जंगल परीसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने वन्य प्राण्यांमुळे नुकसान सोसावे लागते. चितलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) या भागामध्ये रानडुकरांची प्रचंड दहशत आहे. त्यांच्या त्रासामध्ये हाता-तोंडाशी अालेले पीक नष्ट होते. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासह अन्य कामे करता येत नाहीत. त्यातच वन्यप्राणी कायद्यामुळे संरक्षित असल्याने त्यांना प्रतिबंध कसा करावा हीच शेतकऱ्यांसमोर प्रमुख समस्या बनली आहे. या गावातील प्रयोगशील शेतकरी विजय इंगळे यांचीही शेती ही सातपुड्याला लागून असलेल्या भागात अाहे. या भागात शेतीला वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास होतो. पिकाला जपण्यासाठी मोठा खर्च येतो. रात्र रात्र जागरण करावे लागते. शेतामध्ये एकट्या दुकट्या शेतकऱ्यांवरही वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. अनेक शेतकरी फोरेट या उग्र गंध असलेल्या दाणेदार कीटकनाशकांचा वापर करून वन्यप्राण्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अलीकडे त्यालाही रानडुकरे जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी विजय इंगळे यांनी उत्तम उपाय शोधला आहे. असा आहे उपाय ः

  • तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील एका कारागीराच्या मदतीने विजय इंगळे यांनी फिरणारा व तीव्र प्रकाश फेकणारा लाइट तयार करून घेतला. याला ऊर्जा पुरवण्यासाठी सहा व्हॅट क्षमतेच्या बॅटरीचा वापर केला आहे. या बॅटरी दिवसभर चार्ज केल्यास रात्रभर दिवा कार्यरत राहतो. या साऱ्यासाठी अवघे सातशे रुपये खर्च आला.
  • शेताच्या मध्यभागी हा लाइट लावल्यास सुमारे सहा एकरांपर्यंत लखलखीत प्रकाश पडतो. एलईएडी लाइटचा प्रकाश हा डोळे दिपवणारा असल्याने डुकरे येत नसल्याचा अनुभव आहे.
  • असे तीन लाइट बनवून घेतले असून, रब्बीत लागवड केलेल्या हरभरा, मका पिकांमध्ये त्यांचा वापर केला आहे. त्याचा चांगला फायदा होत असल्याचे विजय इंगळे यांनी सांगितले.
  • संपर्क ः विजय इंगळे, ९६०४०५६९४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com