तंत्रज्ञानातूनच अंकुरतील कृषी क्षेत्राच्या भवितव्याची बीजे

तंत्रज्ञानातूनच अंकुरतील कृषी क्षेत्राच्या भवितव्याची बीजे
तंत्रज्ञानातूनच अंकुरतील कृषी क्षेत्राच्या भवितव्याची बीजे

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात परिवर्तन आणले असून, त्याचा दूरगामी, खोलवर परिणाम झाला आहे. नव्या तंत्रज्ञानाने पारंपरिक विचारांनाच आव्हान दिले आहे. केवळ काही वस्तू किंवा गोष्टीच बदलल्या नसून, अनेक गोष्टी करण्याची पद्धतही बदलली आहे. अशा तंत्रज्ञानाच्या आधाराने शेतीमध्ये नाविन्य कल्पना, उद्योग येत आहेत. त्याचा सकारात्मक वापर केल्यास शेतकऱ्यांची दुप्पट उत्पन्नाकडे वाटचाल सुलभ होईल, यात शंका नाही. भारतातील ५० टक्क्यांहून अधिक रोजगार शेती व संबंधित व्यवसायातून निर्माण झाले असले तरी त्यांची क्रयशक्ती कमी आहे. कारण देशातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी लहान व अल्प भूधारक गटात (सरासरी दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले) आहेत. यामुळे शेतीमध्ये नवे महागडे बी-बियाणे, खते यांचा वापर करण्याची इच्छा असूनही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यातच शासकिय नियमन, वाहतूक, साठवण आणि वितरणातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परिणामी त्याचे उत्पादन आणि उत्पन्न घटते. या साऱ्या समस्यांवर मात करण्याची क्षमता नव्या तंत्रज्ञानामध्ये नक्कीच आहे. अद्याप ग्रामीण भागामध्ये फारसे डिजिटायझेशन झालेले नसले तरी जागतिक विचार करता भारतीय शेतीक्षेत्रही नव्या तंत्रज्ञानापासून दूर राहू शकत नाही. भारतीय शेतीपद्धतीचे प्रमुख टप्पे

  1. फार्मिंग १ ः काळ - स्वातंत्र्यानंतर व साठच्या मध्यापर्यंत वैशिष्ट्य - जमीनविषयक सुधारणा
  2. फार्मिंग २ ः काळ ः १९६० पासून (हरितक्रांतीचा कालावधी) आतापर्यंत. यात शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम जाती, खते मिळाली. यांत्रिकीकरणाचा वेग वाढला. जलसिंचनाच्या सोयीमध्ये वाढ झाली. वैशिष्ट्य व उद्देश ः भारताला अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करून अन्नसुरक्षा निर्माण करणे.
  3. फार्मिंग ३ ः काळ ः माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्ट फोनच्या उदयानंतर. वैशिष्ट्ये ःमध्यस्थांचे प्रमाण कमी करून शेतकरी व ग्राहकांना सेवा देणे. नाविन्यपूर्ण उद्योग कल्पना (स्टार्ट अप) शेतीत काम करण्याच्या विविध प्रक्रियांना आव्हान निर्माण झाले आहे.

या तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकेपणाने व शाश्वत शेती करणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यातील मनुष्यबळ कमतरता, प्रक्रिया व तंत्रज्ञान या आव्हानांचा सामना करण्यासाठी नाविन्य, डिजिटल क्रांती उपयुक्त ठरणार आहे. त्यात ग्रामीण भागामध्ये स्मार्टफोन व त्याला आवश्यक इंटरनेट डेटाची उपलब्धता वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी नवे पर्याय खुले होत आहेत. - स्मार्ट फोन आधारीत व शेतकरीकेंद्रित विविध उपक्रमांमध्ये अलीकडे वाढ होत आहे. शेती संबंधित बहुभाषिक अॅपद्वारे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस माहिती शेतकऱ्यांसाठी सहज उपलब्ध होत आहे. त्यात हवामानविषयक अंदाज, बाजारातील दर अशी प्रत्यक्ष वेळेवरील माहिती मिळते. त्याच वेळी एकमेकाशी व कृषितज्ज्ञांशी संवाद साधण्याची सोयही मिळते.

  • शेतीकामासाठी सातत्याने विविध यंत्रांची आवश्यकता भासत असते. अनेक वेळा ही यंत्रे वर्षातून एकदा किंवा दोनदाच वापरली जातात. अन्य वेळी त्यांचा वापर अत्यंत कमी असल्यामुळे अल्पभूधारकांना ती खरेदी करणेही परवडत नाही. अशा वेळी ट्रॅक्टर किंवा अशी यंत्रे भाड्याने देण्याची व्यवस्था उभी राहत आहे. त्यात अनेक प्रथितयश कंपन्याही उतरल्या आहेत. हे सारे प्रत्यक्षामध्ये येत आहे.
  • शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान, मातीची स्थिती, ओलावा, पिकांची वाढीची स्थिती यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी ड्रोन आणि त्यावरील विविध उपकरणे आपल्या मदतीला येणार आहेत. आकाशामध्ये सोडलेले उपग्रहाद्वारे पिकाखालील क्षेत्र मोजण्यासोबतच हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या साऱ्यामुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल.
  • मोबाईल आधारीत डिजिटल व्यवस्था उभारणे सहज शक्य आहे. त्याद्वारे शासकीय लाल फितीच्या कारभारावरही वचक ठेवता येईल. मध्यस्थांची संख्या कमी होऊन, पुरवठा साखळी लहान होईल.
  • परिणामी व्यर्थ खर्च कमी होतील. हा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही होणार आहे.
  • कर्जे, साधने, सल्ला सेवा वा बाजारातील संबंध अशा बाबतीत अनौपचारिक किंवा असंघटित घटकांवरचे शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याकडे वाटचाल सुरू होईल.
  • (लेखक महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि.चे अध्यक्ष (कृषी क्षेत्र), व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com