हळदीवरील करपा, कंदकूज रोगांचे नियंत्रण

हळदीवरील करपा, कंदकूज रोगांचे नियंत्रण
हळदीवरील करपा, कंदकूज रोगांचे नियंत्रण

हळद व आले या पिकांच्या शाकीय वाढीत निर्माण होणारी पानांची व फुटव्यांची संख्या यांचा उत्पादनवाढीमध्ये मोठा वाटा असतो. मात्र यंदा लांबलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तसेच वातावरणात अधिक काळ आर्द्रता राहिली. परिणामी या पिकात कंदकूज व करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करावी. हळद व आले या पिकांची शाकीय वाढ पूर्ण होऊन कंद वाढ होत आहे. शाकीय अवस्थेत पानात अन्न साठविले जाते. सातव्या महिन्यानंतर ते कंदाच्या वाढीसाठी वापरले जाते. मात्र रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास रोग व कीड यांच्याकडूनच अन्नाचा वापर केला जातो. परिणामी उत्पादनात घट येते. कंदकूज : रोगकारक बुरशी : फ्युजॅरियम, पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्‍टोनिया लक्षणे ः कंदकुजीचे प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. नुकसान : उत्पादनात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट होते.

नियंत्रण ः जैंविक नियंत्रण - प्रतिबंधात्मक उपाय जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस 2 ते 2.5 किलो प्रतिएकरी 250 ते 300 किलो सेंद्रिय खतामध्ये  

रासायनिक नियंत्रण : आळवणी प्रतिलिटर पाणी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 4 ते 5 ग्रॅम रोगाची तीव्रता जास्त असल्यास आळवणी प्रतिलिटर मेटॅलॅक्‍सिल 8 टक्के अधिक मॅंकोझेब 64 टक्के (संयुक्त बुरशीनाशक) 4 ग्रॅम सूचना : आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. करपा रोगकारक बुरशी : कोलेटोट्रिकम कॅपसिसी, टॅफ्रिना अनुकूल वातावरण : सकाळी पडणारे धुके व दव लक्षणे : कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे अंडाकृती ठिपके पानावर पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. टॅफ्रिना या बुरशीमुळे असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके पानावर आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. नुकसान : लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.

नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मॅंकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 2.5 ते 3 ग्रॅम सूचना : धुके 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास 15 दिवसांच्या अंतराने सात महिने पूर्ण होईपर्यंत आलटून-पालटून फवारण्या कराव्यात. कंदमाशी अनुकूल वातावरण : लांबलेला पावसाळा ओळख : ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. अळी पिवळसर असून, तिला पाय नसतात. आढळ : कंदकूज झालेल्या रोगग्रस्त भागामध्ये प्रामुख्याने कंदमाशीच्या अळ्या सापडतात. नियंत्रण : वेळ : कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच

  • फोरेट (10 टक्के) दाणेदार एकरी आठ किलो या प्रमाणात जमिनीत टाकावे. किंवा
  • क्‍लोरपायरीफॉस (50 टक्के) 5 मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.
  • इतर व्यवस्थापकीय बाबी :

  • पोटॅशची कमतरता असलेल्या शेतामध्ये एकरी 50 किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडाला वजन येण्यास तसेच जाडी वाढून चकाकी येण्यास मदत होते.
  • दुपारच्या वेळी साधारणतः तापमान 35 अंश सेल्सिअसच्यावर गेल्यानंतर हळदीची पाने गोलाकार झालेली दिसतात. हा कोणताही रोग नसून, जास्त उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिकाची नैसर्गिक क्रिया आहे. अशी पाने तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा सरळ होतात.
  • साधारणतः पाच महिने पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरवात होते. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरवात झाल्याचे लक्षण आहे. हळदीची पाने तशीच झाडावर ठेवल्यास कोणताही तोटा होत नाही. परंतु, फुले कापून काढल्यास त्यांच्या देठाच्या कापलेल्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. परिणामी कंदकूज रोग लागण्याचा धोका निर्माण होतो.
  • कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये हळदीला पाण्याची गरज मर्यादित असते. त्यामुळे सात महिने पूर्ण झाल्यानंतर हळदीस पाणी देण्याचा कालावधी हळूहळू कमी करत जावा. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाणी बंद करावे. त्यामुळे पानामधील अन्न कंदामध्ये उतरण्यास मदत होते व हळदीस उतारा चांगला मिळतो.
  • हळद पिकास लागवडीपासून नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय काढणीची गडबड करू नये; अन्यथा उत्पादनामध्ये घट होऊन हळदीची प्रत खालावते.
  • संपर्क ः डॉ. जितेंद्र कदम, 9822449789 (काढणीपश्‍चात व्यवस्थापन, पदव्युत्तर संस्था, किल्ला रोहा, जि. रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com