agriculturai stories in marathi, agrowon,clear economics is necessary in agriculture | Agrowon

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थशास्त्रीय नेमकेपणा आवश्यक
वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी शेती उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावरील नेमक्या निविष्ठा आणि घटकांचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्ये खास अर्थशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात संगणकीय पद्धतीने प्रामुख्याने हरितगृह शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग याविषयी निविष्ठा वापर कार्यक्षमता मिळविण्यात आली.

कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी शेती उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावरील नेमक्या निविष्ठा आणि घटकांचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्ये खास अर्थशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात संगणकीय पद्धतीने प्रामुख्याने हरितगृह शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग याविषयी निविष्ठा वापर कार्यक्षमता मिळविण्यात आली.

वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची समस्या सोडविण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पिकांच्या उत्पादनासाठी आवश्यक पाणी, ऊर्जा, कार्बन डायऑक्साइड, माध्यमे (माती इ.) अशा सर्व घटकांचा अत्यंत कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचीही गरज आहे. अशा वेळी नवीन गुंतवणूक होण्यासाठी प्रतिकिलो उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक निविष्ठा व घटकांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणारी व्यक्तीही उत्पादनखर्च आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा प्रामुख्याने विचार करते. त्यामुळे शाश्वत उत्पादन आणि आर्थिक दृष्टीने सक्षमता येण्यासही मदत होईल.

अत्याधुनिक शेतीमध्ये अलीकडे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांचे प्रश्न प्रामुख्याने शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्रोतांसंबंधी असतात. यावर अधिक नेमकेपणाने काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अमेरिकेतील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन येथील हरितगृह व फळबाग विषयातील तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी स्रोत व नेमके प्रमाण मिळविण्यासाठी संगणकीय प्रारूपांचा वापर केला आहे. त्याद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील आणि कोणत्याही लागवड पद्धतीतील निविष्ठा व आवश्यक घटकांचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. याचा फायदा भविष्यामध्ये शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यासाठी होऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.

  • पहिल्या टप्प्यामध्ये वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांनी फळबाग लागवडीतील निविष्ठांची वापर कार्यक्षमता (रिसोर्स यूज इफिशियन्सी) काढली आहे. त्यासाठी नव्याने शेतीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांच्या प्रश्नांचाही विचार केला आहे. भविष्यात या प्रश्नांची गुंतवणूकदारनिहाय उत्तरे काढण्यासाठी खास साधनही तयार करण्याचा विचार आहे.
  • उत्तर स्वीडन, अबू धाबी आणि नेदरलॅंड या तीन ठिकाणांचा अभ्यासामध्ये समावेश होता.
  • नियंत्रित हरितगृह शेती आणि वनस्पतींची कंपनीसदृश एकापेक्षा अधिक थरांची संपूर्ण नियंत्रित शेती पद्धती यांचा तुलनात्मक अभ्यास केला.
  • कोणतीही शेती पद्धतीही सर्व प्रकारे चांगली असू शकत नाही. मात्र, हरितगृहातील शेती ही कंपनीसदृश एकापेक्षा अधिक थरांच्या शेतीपेक्षा अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरते. सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणीही असेच निष्कर्ष मिळाले आहेत.
  • पाणी आणि जमीन या दोन घटकांचा विचार केल्यास मात्र व्हर्टिकल फार्मिंग अधिक उपयुक्त ठरू शकते. प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारणार आहे, यानुसार प्रत्येक निविष्ठेचे मूल्य बदलणार आहे. हे शहरामध्ये किंवा शहराच्या अत्यंत जवळ असल्याने वाहतुकीच्या खर्चामध्ये प्रचंड बचत होऊ शकते. बाजारपेठ व उत्पादन केंद्र जवळ असल्याचा फायदा उत्पादकांसह ग्राहकांना मिळू शकतो.
  • या संशोधनासाठी युरोपियन संघाच्या होरायझन २०२० या कार्यक्रमातून आणि नेदरलॅंड येथील उच्च तंत्रज्ञान कंपन्यांकडून आर्थिक निधी उपलब्ध झाला आहे.

अशा अभ्यासाची मोठी आवश्यकता
अलीकडे अत्याधुनिक प्रामुख्याने हरितगृह आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. यातून एखाद्या कंपनीप्रमाणे शाश्वत उत्पादनाची हमी मिळू शकते. मात्र, तरिही त्यात वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा आणि आवश्यक नैसर्गिक घटकांविषयी अनिश्चितता कायम आहे. केवळ फायदा आणि आकडेवारी समजणाऱ्या लोकांसाठी नैसर्गिक प्रक्रियेतील चढ-उतारांचाही नेमका पॅटर्न मिळण्याची अपेक्षा असते. त्यातून धोक्यांचे प्रमाण कमी करणे, शाश्वतता वाढवणे आणि फायद्यांचे प्रमाण वाढवणे शक्य आहे. ती सध्याच्या कोणत्याही कृषी अर्थशास्त्रविषयक अभ्यासातून पूर्ण होताना दिसत नाही.

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...