किसान सभेचे राज्यभर बुधवारी रास्ता रोको आंदोलन

किसान सभेचे राज्यभर बुधवारी रास्ता रोको आंदोलन
किसान सभेचे राज्यभर बुधवारी रास्ता रोको आंदोलन

नगर  : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेसह अन्य शेतकरी संघटनांतर्फे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. ८ ) देशव्यापी ग्रामीण भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यभरातील २१ जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको करून ग्रामीण भारत बंद आंदोलनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले. देशभरातील २०८ शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. 

महाराष्ट्र किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी शेतीमालाला दीडपट भावाची हमी मिळेल अशी धोरणे स्वीकारा, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल अशी पीक विमा योजना सुरू करा, कसत असलेल्या जमिनीचे हक्क कसणाऱ्यांच्या नावे करा व शेतीच्या सर्वंकष, शाश्वत व गतिमान विकासासाठी डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पर्यायी शेती धोरणाची आखणी करा या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. अखिल भारतीय स्तरावर याच दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांनी देशव्यापी औद्योगिक बंदची देखील हाक दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com