ठाकरे सरकार दोन नवे विभाग निर्माण करण्याच्या तयारीत : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

ठाकरे सरकार दोन नवे विभाग निर्माण करण्याच्या तयारीत : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
ठाकरे सरकार दोन नवे विभाग निर्माण करण्याच्या तयारीत : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार दोन नवे विभाग निर्माण करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती  दिली.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. थोरात यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की नवीन विभाग करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. वाणिज्य व व्यापारासाठी आणि देवस्थान संदर्भातही नवा विभाग करण्याचा विचार सुरू आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयाला मंत्री दिला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले :

  • तीन पक्षांचे सरकार असल्याने चर्चेतून खातेवाटप खेळीमेळीने पार पडले.
  • ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांच्यात थोडी नाराजी दिसत आहे. पण त्यांना बरोबर घेऊन त्यांची नाराजी दूर करू.
  • मी आधी महसूलमंत्री असताना बदल करून सहजता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
  • गेल्या पाच वर्षांत त्यांच्याकडे (चंद्रकांत पाटील) अधिक खाती असल्याने आणि राजकीय जबाबदारी असल्याने ते तितकेसे लक्ष देऊ शकले नसावेत, असं मला वाटतं
  • कर्जमुक्तीच्या प्रक्रियेची मोठी जबाबदारी महसूलकडे येणार आहे.
  • सरकार तीन पक्षांचे असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसारच काम करणार आहोत.
  • शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करू.
  • सरकारमधील समन्वयासाठी दोन समित्या करणार असून एक कॅबिनेटची असेल आणि दुसरी बाहेरची. 
  • उद्धव ठाकरे यांच्यात खुला संवाद करण्याची पद्धत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com