लसूण प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर फायदेशीर

लसणाच्या योग्य साठवणीबरोबरच लसणापासून प्रक्रिया पदार्थांची निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक यंत्रांची माहिती घेऊयात.
garlic sorting machine
garlic sorting machine

लसणाच्या योग्य साठवणीबरोबरच लसणापासून प्रक्रिया पदार्थांची निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक यंत्रांची माहिती घेऊयात.

रोजच्या स्वयंपाकामध्ये लसणाचा वापर केला जातो. त्याच प्रमाणे विविध मसाल्यांमध्येही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बदलत्या वेगवान जीवनशैलीमध्ये रोजच्या रोज लसूण सोलणे, त्याची पेस्ट बनवणे गृहिणींना शक्य होत नाही. अशा वेळा लसूण पेस्ट, लसूण पावडर, लसूण प्युरी, लोणचे, फ्लेक्स, स्लाईस यासारख्या प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली मागणी आहे. हा उद्योग उभारणीसाठी ३ ते ४ लाख रुपये गुंतवणूक पुरेशी ठरते. उद्योगासाठी एफ.एस.एस.ए.आय. चा परवाना अनिवार्य आहे. लसूण प्रतवारी यंत्र यंत्राद्वारे लसणाचे वजन, आकार यानुसार विभागणी करणे सोपे असते. या यंत्रामध्ये ३० मि.मी. पेक्षा लहान, दुसरे ३० -४० मि.मी. आणि तिसरे ४५ मि.मी. व त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या लसणाचे तीन प्रतींमध्ये विभाजन होते. सर्व लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर रोटरी स्क्रिनच्या साह्याने वेगवेगळया आकाराच्या छिद्रानुसार लसणाची विभागणी होते. तो लसूण बाहेर वेगवेगळ्या क्रेटमध्ये टाकला जातो. एकूण लसूण ग्रेडची कार्य क्षमता ८२ टक्के आहे. हे यंत्र पूर्णपणे स्टील व लोखंडचे बनलेले असून थ्री फेजवर चालते. त्यासाठी ३ एच. पी. विद्युत मोटार लावलेली असते. वजन ७० किलो असून, तासाला १०० ते १२० किलो लसणाची प्रतवारी केली जाते. क्षमतेनुसार यंत्राची किंमत ही ५० हजार रुपयांपासून पुढे आहेत.   लसूण पाकळ्या काढणारे यंत्र    लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. यंत्रांमध्ये कुशीड बटन्स, कन्व्हेयर आणि एक पोकळ सिलेंडर असते. लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर कन्व्हेयरने पुढे ढकलले जाऊन त्यावर बटेन्सच्या साह्याने घर्षण केले जाते. लसणापासून पाकळ्या वेगळ्या केल्या जातात. या वेगळ्या झालेल्या पाकळ्या ऑपरेटरच्या साह्याने आउटलेटमध्ये पाठविल्या जातात. आउटलेटमधून लसूण खाली कंटेनरमध्ये जमा होतो. उरलेला लसणाचा कचरा हा पोकळ सिलेंडरच्या साह्याने बाहेर फेकला जातो. पूर्णपणे लोखंडाने बनलेल्या या यंत्राची क्षमता ताशी ६० ते ८० किलो इतकी आहे. यंत्राला अर्धा एच. पी. ची विद्यूत मोटार जोडलेली असते. या मध्ये स्वयंचलित व अर्धस्वयंचलित असे दोन प्रकार आहेत. यंत्राचे वजन ५० किलो असून यंत्र थ्री फेजवर चालते. यंत्राची किंमत २० हजार रुपयांपासून सुरु होते. यंत्राचा वापर केल्यानंतर यंत्राला गरम पाण्याने धुऊन घ्यावे.  

 - सचिन मस्के, ९०४९९६७२५७ (पीएच. डी. विद्यार्थी, अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सॅमहिंगिन बॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय,  प्रयागराज, उत्तरप्रदेश)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com