Agricultural Agriculture News Marathi article regarding poultry bird management. | Agrowon

कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरता

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील
शुक्रवार, 29 मे 2020

कोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची कार्ये करीत असतात. अंड्याचे कवच तयार करणे, हाड मजबूत करणे, शरीराची वाढ करणे, रक्त तयार होण्याचे कार्य क्षारामुळे घडत असते. या खनिजांच्या कमतरतेमुळेही कोंबड्यांमध्ये आजार दिसतात, समस्या निर्माण होतात.

कोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची कार्ये करीत असतात. अंड्याचे कवच तयार करणे, हाड मजबूत करणे, शरीराची वाढ करणे, रक्त तयार होण्याचे कार्य क्षारामुळे घडत असते. या खनिजांच्या कमतरतेमुळेही कोंबड्यांमध्ये आजार दिसतात, समस्या निर्माण होतात.

व्यावसायिक कुक्कुटपालन बाजारपेठेतील उपलब्ध संतुलित कोंबडी खाद्याचा वापर करतात. परंतु परसबागेतील कोंबड्यांना शक्‍यतो शिल्लक भाजीपाला, धान्य, उपलब्ध वनस्पती खाण्यासाठी दिल्या जातात. यामधून सर्व पोषणतत्त्व कोंबड्यांच्या शारीरिक गरजेनुसार मिळतील हे सांगता येत नाही. यामुळे पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे कोंबड्यांमध्ये अनेक आजार उद्भवण्याची भिती असते. असे आजार कधी कधी व्यावसायिक कुक्कुटपालनामध्येही आढळून येतात.
  कोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची कार्ये करीत असतात. अंड्याचे कवच तयार करणे, हाड मजबूत करणे, शरीराची वाढ , रक्त तयार होण्याचे कार्य घडत असते. याच्या कमतरतेमुळेही बऱ्याचवेळा कोंबड्यांमध्ये आजार दिसतात, समस्या निर्माण होतात.

कमतरतेची लक्षणे
कॅल्शिअम ः पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे, अंडी उत्पादन कमी होणे, अंडी उबवणीचे प्रमाण कमी होणे, वाढ खुंटणे.
उपाय ः कॅल्शियमयुक्त पावडर १५ ते २० ग्रॅम प्रति १०० कोंबड्या याप्रमाणे किंवा कॅल्शियमयुक्त द्रावण  २० मिली प्रति १०० कोंबड्या याप्रमाणे द्यावे.

स्फुरद (फॉस्फरस) ः हाडे नाजूक व ठिसूळ होणे, अंडी उत्पादन कमी होणे, वाढ खुंटणे.
उपाय ः फॉस्फरसयुक्त पावडर उत्पादकाच्या सूचनेप्रमाणे किंवा फॉस्फरसयुक्त द्रावण १५ ते २० मिली प्रति  १०० कोंबड्यांना पाण्यातून द्यावे.

मॅग्नेशिअम ः भूक मंदावणे, अंग थरथरणे, पाय जड होणे, त्वचा खरबरीत जाड होणे.
उपाय ः मॅग्नेशियमयुक्त पावडर उत्पादकाच्या सूचनेप्रमाणे द्यावी.

मॅंगेनीज ः पाय बाहेरील बाजूस वळतात, पायाला सूज येते, पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे, अंडी उबवणीचे प्रमाण कमी होणे, विकृत इम्ब्रीओ.
उपाय ः मॅंगेनिजयुक्त पावडर  उत्पादकाच्या सूचनेप्रमाणे किंवा  मॅंगेनिजयुक्त द्रावण २० मिली प्रति १०० कोंबड्यांसाठी प्रमाण द्यावे.

झिंक ः पंखाची वाढ कमी होते, पायाची हाडे आखूड होतात व पायाचा (हॉक) जॉईंट सुजतो.
उपाय ः  झिंकयुक्त पावडर किंवा द्रावण उत्पादक किंवा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार द्यावे.

लोह, कॉपर ः रक्तक्षय, पंखाचा रंग बदलतो.
उपाय ः लोह व कॉपरयुक्त पावडर उत्पादकाच्या सूचनेनुसार वापरावी.

सेलेनियम ः मांसल भागावर पांढरे पट्टे दिसतात. मांसामध्ये रक्ताचे डाग दिसतात.
उपाय ः सेलेनियमयुक्त पावडरचा उत्पादकाच्या सूचनेनुसार वापर करावा.

सोडियम व पोटॅशिअम ः चोचीची वाढ होत नाही.
उपाय ः  सोडियम व पोटॅशियमयुक्त पावडर उत्पादक व तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावी.

 -  डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ८३२९७३५३१४
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

टॅग्स

इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...