Agricultural Agriculture News Marathi article regarding village budget planing. | Agrowon

समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प

डॉ. कैलास बवले
शुक्रवार, 29 मे 2020

‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत ग्रामविकासाचे टप्पे समजाऊन घेतले. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक ग्रामस्थांनी गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा याची विचारणा केली. म्हणूनच आजच्या भागांमध्ये आपण पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्पातील घटकांची माहिती घेत आहोत.

‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत ग्रामविकासाचे टप्पे समजाऊन घेतले. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक ग्रामस्थांनी गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा याची विचारणा केली. म्हणूनच आजच्या भागांमध्ये आपण पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्पातील घटकांची माहिती घेत आहोत.

गावाच्या आर्थिक स्थितीबाबत आणि प्रत्यक्ष त्यातून विकास घडवून आणण्यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्या म्हणजे गावाचा अर्थसंकल्प आणि गावाचा विकास आराखडा.
गावाच्या शाश्‍वत विकासासाठी केवळ आर्थिक संसाधने पुरेशी नसतात, तर शाश्‍वत विकासासाठी त्या गावातच उपलब्ध असलेली नैसर्गिक व मानव संसाधनेही महत्त्वाची असतात. गावाच्या जल, जंगल व जमीन
या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गावाच्या शाश्‍वत विकासासाठी जमिनीचे आरोग्य व उत्पादकता, पाण्याचे आरोग्य व कार्यक्षम व्यवस्थापन आणि वनांचे संरक्षण, संवर्धन याचा योग्य आराखडा तयार करणे ही प्रथम प्राधान्याची बाब आहे. त्यासाठी गावाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून ग्रामविकास आराखड्यात त्याचा अंतर्भाव करावा लागतो.

अनुदान  ः  या प्रकारात जमीन महसूल, अनुदान, उपकर अनुदान, गौण खनिजे अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान, आदिवासी/मागासवर्गीय ग्रामपंचायत अनुदान, वित्त आयोग अनुदान ग्रामपंचायतीला मिळत असते.
कर ः अनुदानाशिवाय दुसरा मार्ग म्हणजे कर. घरपट्टी, ठोक अंश दान, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पाणीपट्टी, बाजारकर, करमणूक कर, सार्वजनिक जागेचा भोगवटा कर, विहीर-तलाव पाणीपट्टी, सुधार कर इत्यादी तर आकारणी ग्रामपंचायत करू शकते.
इतर उत्पन्न ः उत्पन्नाचा तिसरा मार्ग म्हणजे इतर उत्पन्न. यामध्ये इमारत भाडे, जागा भाडे, कोंडवाडा फी व दंड, विक्रीचे उत्पन्न, दान, देणग्या, कर्ज, लोकवर्गणी, विशिष्ट योजनेसाठी अनुदान, दाखले, नक्कल फी. अशा प्रकारे गावाचे व खर्च याचे वार्षिक विवरण पत्रक म्हणजे अंदाजपत्रक हे गावाचे कामकाज आणि विकास दिशेचा आरसा असते.

 

ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प

ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या कामामध्ये प्रामुख्याने कृषिविकास, पशुसंवर्धन, वने आणि गायरान विकास, समाज कल्याण, शिक्षण व प्रौढ शिक्षण, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, आरोग्य इमारती, दळणवळण, लघू पाटबंधारे, जलव्यवस्थापन, ग्रामीण उद्योगधंदे, कुटीरोद्योग, स्वसंरक्षण, सहकाराची कामे, सामान्य प्रशासन, पिण्यासाठी पाणीपुरवठा यांचा समावेश होतो. या सर्व कामासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी विविध मार्गांनी ग्रामपंचायतीस हा पैसा मिळत असतो. त्यालाच ग्रामपंचायतीचे उत्पन्न असे म्हणतात. या सर्व कामावर खर्च होतो त्यास ग्रामपंचायतीचा वार्षिक खर्च म्हणतात. असे उत्पन्न व खर्चाचे वार्षिक विवरणपत्रक तयार केले जाते. त्यास ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणतात. ग्रामपंचायतीस कामे करण्यासाठी जे उत्पन्न हवे असते तो पैसा ग्रामपंचायतीस प्रमुख तीन मार्गांनी मिळतो. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीस सरकारकडून अनुदान मिळते., ग्रामपंचायत लोकांकडून कर वसूल करते आणि  ग्रामपंचायतीस इतर साधनांपासून उत्पन्न मिळते.

पुढील भागात आपण एका उदाहरणामध्ये गावाची अर्थव्यवस्था कशी आहे आणि गेल्या दहा वर्षात ग्रामअर्थव्यवस्था कशाप्रकारे सुधारली. हे त्या गावाच्या मागील दहा वर्षांच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून पहाणार आहोत.

-   डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७
(समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)


इतर ग्रामविकास
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...