agricultural news in marathi ‘Anujaya’ brand in the dal manufacturing industry | Agrowon

डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्ड

अभिजित डाके
रविवार, 10 ऑक्टोबर 2021

ढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम पाटील यांनी प्रक्रिया व्यवसायाचा अभ्यास करून २०१७ मध्ये डाळ मिल सुरू केली. अथक परिश्रमातून त्यांनी ‘अनुजय' या ब्रॅंडनेमच्या माध्यमातून बाजारपेठेत विविध प्रकारच्या डाळी, हळद पावडर निर्मितीमध्ये स्वतंत्र ओळख तयार केली आहे.
 

ढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम पाटील यांनी प्रक्रिया व्यवसायाचा अभ्यास करून २०१७ मध्ये डाळ मिल सुरू केली. अथक परिश्रमातून त्यांनी ‘अनुजय' या ब्रॅंडनेमच्या माध्यमातून बाजारपेठेत विविध प्रकारच्या डाळी, हळद पावडर निर्मितीमध्ये स्वतंत्र ओळख तयार केली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा प्रामुख्याने ऊस आणि हळदीमध्ये अग्रेसर. याच तालुक्यातील ढवळी हे बागायती गाव. याच गावातील सौ. चारुलता उत्तम पाटील या प्रयोगशील महिला शेतकरी. यांचे माहेर नेर्ले. परंतु वडील नोकरी निमित्त पहिल्यापासून मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लहानपण आणि शिक्षण मुंबईत गेले. मात्र सुट्टीला गावाकडे येत होत्या. गावाकडील शेतातील पिकांची माहिती घेण्याची पहिल्यापासूनच उत्सुकता होती. परंतु काही कारणास्तव त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. लग्नानंतर त्या ढवळी गावी सासरी आल्या. चारुलता यांचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती उत्तम पाटील यांनी पुढाकार घेतला. चारुलता यांनी अर्थशास्त्र पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, सरकार मान्य कोर्स करून ब्युटीपार्लर सुरु केले. पण त्यात मन रमले नाही. शेतीपूरक उद्योगाच्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

शेती नियोजनात सहभाग 
शेती नियोजनातील सहभागाविषयी चारुलताताई म्हणाल्या की, आमची घरची दोन एकर शेती. यामध्ये भाजीपाला पिकांसह अन्य पिकांची लागवड असते. मुंबईमध्ये लग्नापर्यंत वास्तव्य केल्याने शेतातील कामे कशी करायची याची काहीच माहिती नव्हती. परंतू सासरी आल्यावर शेती व्यवस्थापनाचे धडे घेतले. त्यानंतर १५ गाईंचा गोठा उभा केला. जनावरांचे व्यवस्थापन कसे करायचे याचीही माहिती घेऊन गोठ्याचे नियोजन करू लागले. परंतु उपलब्ध जागेची मर्यादा आणि प्रक्रिया उद्योग करायचे ठरविल्याने गोठा बंद केला.

प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने...
केवळ शेती करून आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर चारुलता पाटील यांनी पूरक उद्योग म्हणून पहिल्यांदा पीठ गिरणी सुरु केली. पण हा व्यवसाय मर्यादित होता. त्यामुळे पतीबरोबरीने चर्चाकरून अजून कोणता नवा पूरक उद्योग करता येईल याचा विचारविनिमय केला. चारूलता पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी अपेक्षा महिला बचत गटाची स्थापना करून विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. यादरम्यान महिला बचत गटाच्या माध्यमातून पुणे, जळगाव, मराठवाडा या ठिकाणी प्रवास झाला. त्याठिकाणी त्यांनी शेती पूरक व्यवसायांची माहिती घेतली.

विविध व्यवसायांचा अभ्यास आणि तालुका कृषी अधिकारी पठाण यांच्या सल्याने त्यांनी डाळ मिल सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाटील दांपत्याने पलूस तालुक्यातील कुंडल आणि कडेगाव येथील डाळ मिलमध्ये भेट दिली. या उद्योगाचा आर्थिक आणि बाजारपेठेचा अभ्यास केला. जिद्द आणि सचोटीच्या जोरावर डाळ मिल उभारणीचा निर्धार केला.

डाळ मिलची उभारणी 
पाटील यांनी २०१७ च्या दरम्यान, डाळ मिलसाठी लागणाऱ्या यंत्रांची खरेदी केली. यासाठी कृषी विभागाकडून दीड लाख रुपये आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेतून २५ टक्के अनुदान मिळाले. आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे डाळ मिल व्यवसायाची उभारणी सुरू झाली. या दरम्यान डाळ मिल वापराबाबत सविस्तर माहिती घेतली.टप्याटप्याने डाळ निर्मितीमध्ये सुधारणा होत गेली.या दरम्यान त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून डाळ मिल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले.

विक्री व्यवस्थेमध्ये पतीची साथ 
डाळ प्रक्रिया करणे सोपे असते. परंतु उत्पादनाची विक्री करणे अवघड आहे. बाजारपेठेत अनेक नामांकित ब्रॅण्ड आहेत. त्यांच्याबरोबरीने स्पर्धा करायची झाली तर तितक्या ताकदीने बाजारात उतरावे लागणार होते. त्यामुळे सुरवातीला गाव परिसरातील वडापाव गाड्या, लहान किराणामालाचे दुकानदार यांना एक ते दोन किलो बेसन पीठ पॅकिंग आणि डाळींचे नमुने देण्यास सुरवात केली. तुम्ही पहिल्यांदा याचा वापर करा, मग आम्हाला डाळ आणि बेसन पीठ कसे आहे ते सांगा, अशी विक्रीची पध्दत वापरली. याचबरोबरीने पै-पाहुण्यांनाही तयार केलेले बेसन पीठ आणि डाळ वापरण्यास दिली. त्यांच्याकडून देखील उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत माहिती घेतली. हळू हळू लोकांची डाळ, बेसनपिठाला पसंती मिळू लागली. दररोज एक टन डाळ निर्मितीची आमच्या उद्योगाची क्षमता आहे. माझे पती उत्पादनांच्या विक्रीचे नियोजन पाहतात.

उत्पादनांच्या विक्रीबाबत चारुलताताई म्हणाल्या की, गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे बाजारात मर्यादित मागणी होती. परंतु आता परिस्थिती बदलली असून गणपती, दसरा, दिवाळी सणामुळे मागणीत वाढ होऊ लागली आहे. सध्या लहान-मोठ्या दुकानदारांकडून विविध प्रकारची डाळ आणि बेसन पिठाची मागणी होऊ लागली आहे. ज्यावेळी मी कामानिमित्त परगावी जाते, त्यावेळी आम्ही तयार केलेली उत्पादने जवळ ठेवते. ही उत्पादने नातेवाईक तसेच नव्या दुकानदारांना दिली जातात. त्यांचे संपर्क नंबर घेऊन पुन्हा आठ ते दहा दिवसांनी त्यांना उत्पादनांबाबत विचारणा केली जाते. त्यांच्या मागणीनुसार ही उत्पादने पोहोचविण्यास सुरवात होते. माझी मुलगी आदिती आणि मुलगा आकाश यांची देखील डाळ निर्मिती आणि विक्री नियोजनात मदत होते. हरभरा डाळ ७० रुपये, मूग,उडीद डाळ ११० रुपये, बेसन पीठ ६७ रुपये आणि भरडा १२५० प्रति ५० किलो या दराने विक्री होते. आमच्या प्रक्रिया उद्योगातून वार्षिक सर्व खर्च वजा जाता अडीच लाखांपर्यंत नफा होतो. बाजारपेठेनुसार यामध्ये चढ उतार होतात.

उपलब्ध यंत्रणा 
* हरभरा डाळ यंत्र,* उडीद, मूग डाळ यंत्र
* प्रतवारीचे यंत्र,*वाळवणी यंत्र
*पॉलिश यंत्र,*चाळणी यंत्र

विक्रीचे नियोजन 
* डाळ, बेसन पीठ, भरडा विक्रीसाठी ‘अनुजय' ब्रॅंडनेम.
* स्थानिक शेतकरी, व्यापाऱ्यांच्याकडून कच्चामालाची खरेदी.
* वाळवा, शिराळा,पलूस आणि हातकणंगले तालुक्यात उत्पादनांची विक्री.
* हरभरा, तूर, मूग आणि उडीद डाळ आणि बेसनपीठ निर्मिती.
* कायमस्वरूपी ७ महिलांना रोजगार. हंगामात १५ महिलांना तात्पुरता रोजगार.
* प्रति किलोस १५ रुपयांपासून ते २५ रुपये दराने शेतकऱ्यांना हळद पावडर तयार करून दिली जाते.
* शेतकऱ्यांना कडधान्याची डाळ तयार करून दिली जाते.
* दरवर्षी विविध डाळींची ५० टनांहून अधिक निर्मिती. बेसनाची दहा टन विक्री.

संपर्क ःसौ.चारुलता पाटील, ८००७२७९८०३
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...