agricultural news in marathi ‘Smart Indoor Greenhouse’ for Home Production | Agrowon

घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर ग्रीनहाउस’

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

एखादे रोप लावणे सोपे असले तरी त्याची सातत्यपूर्ण देखभाल करणे अत्यंत अवघड ठरते. पाणी कमी झाले किंवा जास्त झाले, कीड रोग आला अशा कोणत्याही थोड्याशा दुर्लक्ष किंवा चुकीमुळे झाड मरून जाऊ शकते. असे एक दोन अनुभव झाल्यानंतर आपला झाड, रोप लावण्याचा उत्साह कायमचा मावळतो. हे सारे टाळण्यासाठी कंपनीने ‘प्लॅन्टी’ हे घरात उभारण्याजोगे स्मार्ट ग्रीनहाउस विकसित केले आहे.

हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल मानले जात असले तरी त्याच्या खर्चिकतेमुळे अनेक लोक त्यापासून दूरच राहणे पसंत करतात. ही बाब प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असली तरी लहान किंवा अत्यल्प जागेमुळे परसबागेत काही रोपे लावू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती आणखीन अडचणीची ठरते. अशा लहान क्षेत्रावर शेती करू पाहणाऱ्या लोकांसाठी स्मार्ट इनडोअर ग्रीनहाउस बाजारात येत आहे.

घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये एखादे आकर्षक रोप किंवा झाड आपले मन लुभावणारे असते. अशीच एखादी कुंडी आपल्याही घरी, बागेत किंवा गॅलरीत असली पाहिजे, अशी इच्छाही होते. मात्र एखादे रोप लावणे सोपे असले तरी त्याची सातत्यपूर्ण देखभाल करणे अत्यंत अवघड ठरते. पाणी कमी झाले किंवा जास्त झाले, कीड रोग आला अशा कोणत्याही थोड्याशा दुर्लक्ष किंवा चुकीमुळे झाड मरून जाऊ शकते. असे एक दोन अनुभव झाल्यानंतर आपला झाड, रोप लावण्याचा उत्साह कायमचा मावळतो. हे सारे टाळण्यासाठी कंपनीने ‘प्लॅन्टी’ हे घरात उभारण्याजोगे स्मार्ट ग्रीनहाउस विकसित केले आहे.

प्लॅन्टी हे रोप वाढीच्या सर्व बाबींची एकत्रित काळजी घेणारे ग्रीनहाउस आहे. त्यांनी विद्युत प्रवाह सुरू करा आणि विसरून जा, इतक्या सोप्या पद्धतीपर्यंत झाडे वाढवण्याचा अनुभव नेला आहे. यात सर्व प्रकारच्या म्हणजेच बोन्साय, गुलाब, ऑर्किड, सूर्यफूल, मिरची, ढोबळी मिरची, गाजर, मायक्रोग्रीन्स किंवा मांसाहारी वनस्पतीही वाढवणे शक्य आहे.

या छोट्याशा घरगुती स्मार्ट ग्रीनहाऊस बद्दल माहिती देताना ‘प्लॅन्टी इनोव्हेशन्स’ या कंपनीच्या कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ओन्ड्रा झ्बायटेक यांनी सांगितले, की मला स्वतःला रोपे लावण्याचा आणि वाढवण्याचा छंद आहे. मात्र कितीही काळजी घेतली तरी कोणत्या कोणत्या कारणामुळे रोप मरून जाई. ही मोठी दुखःद गोष्ट असे. बाजारामध्ये रोपांची काळजी घेण्यासंदर्भात वेगवेगळी संशोधने असली तरी झाडांच्या उगवण, वाढ आणि सर्वंच टप्प्यांवर उपयुक्त ठरेल, नियंत्रण ठेवेल असे एकही साधन उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून त्यात एक आव्हान आणि आणि उद्योजक म्हणून संधीही दिसली. त्यातूनच तयार झाले आमचे प्लॅन्टी.

प्लॅन्टी हे उत्तम दर्जाच्या पुनर्वापरयोग्य आयोनाइज्ड अॅल्युमिनिअम आणि हार्डन्ड पीएमएमए काचेपासून बनवलेले उपकरण आहे. ते घर किंवा कार्यालयामध्ये ठेवण्यासाठी अत्यंत आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. त्यात झाडासाठी आवश्यक प्रकाश, त्याचे रंग आणि तीव्रता, प्रत्येक झाडानुसार आवश्यक दिवस- रात्रीची योग्य सायकल, मातीची आर्द्रता, हवेचे तापमान, हवेचा प्रवाह अशा अनेक छोट्या मोठ्या बाबींची काळजी घेतली जाते. प्लॅन्टीवर एक डिस्प्ले असून, त्यात रोपांसंबंधी माहिती येत जाते. प्रत्येक रोपांगणिक वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे, झाडांचे प्रत्यक्ष तपासणी आवश्यकतेनुसार त्यात करावयाचे बदल हे सातत्याने कळवले जाते.

या उपकरणामुळे परसबाग, घर, कार्यालयातील सुशोभीकरणाच्या पद्धती यात आमूलाग्र बदल शक्य होतील, असा दावा कंपनीने केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर, बागा, पर्यटन स्थळे यावर अनेक बंधने होती. या काळात घरातच आपली छोटी बाग तरी असावी, हा उद्देश या नव्या उपकरणातून साध्य होईल.

असा होता एका कल्पनेचा प्रवास

 • २०१७ - प्राथमिक कल्पना
 • जून २०१९ - संशोधक, सहसंस्थापक व्हॅलेरी आणि ओन्ड्रा यांनी दोघांनी व्यावसायिक प्लॅन्टी निर्मितीचा निर्णय घेतला.
 • सप्टेंबर २०१९ - उत्पादनाची संकल्पना आणि बाजारपेठेचा अभ्यास केला.
 • नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२० - उत्पादनासाठी प्रोटोटाइप, घटक, धातू यांचा वापर आणि चाचण्या.
 • एप्रिल ते नोव्हेबर २०२० - औद्योगिक उत्पादन आरेखन. आकर्षकता आणि बहुउपयोगिता यांवर विशेष लक्ष.
 • नोव्हेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ - विविध चाचण्या, प्रयोगानंतर कार्यक्षम, काम करणारे प्रोटोटाइप तयार केले.
 • मार्केटिंगसाठी एका कंपनीसोबत मोहिमेची आखणी केली असून, ही मोहीम २८ ऑक्टोबर चालणार आहे.
 • त्यानंतर फेब्रुवारी २०२२ पर्यंत उत्पादन तयारी, व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू होईल.

उपकरणासोबत अन्य उपयुक्त साधने...

 • प्लॅन्टी स्मार्ट इनडोअर ग्रीनहाउस
 • पीक, वनस्पतीच्या विवरणासह यूएसबी प्लॅश ड्राइव्ह
 • स्टार्टर पॅक (बिया, माती, माध्यमे, सुरुवातीची खते इ.)
 • छोटी पाणी टाकी (दीड लिटर क्षमता), स्वयंभरण यंत्रणेद्वारे मोठ्या टाकीशी जोडणे शक्य.
 • मातीमध्ये बसवलेल्या उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टील सेन्सरमुळे योग्य वेळी आपोआप पाणी दिले जाते. पाण्यातील क्षार मोजले जाते.
 • प्रकाश व्यवस्थेसाठी पूर्वनिर्धारित, स्वयंचलित एलईडी. दिवस रात्र यांचे प्रमाण रोपानुसार योग्य ते ठेवता येते.
 •  हवा, वातावरण गरजेनुसार १८ ते ३२ अंश सेल्सिअस ठेवले जाते.
 •  आधुनिक एलसीडी डिस्प्ले.
 • चुंबकयुक्त पाणीपुरवठा पाइपलाइन.

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...
पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...
छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...
हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...