agricultural news marathi Advantages of ‘IMF’ technique for production of purebred milch cows and buffaloes | Agrowon

जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी ‘आयव्हीएफ' तंत्र फायदेशीर

अमित गद्रे
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील दयाराम साहेबराव ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन सरोगेटेड गाईंमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई व्यायल्या आहेत.

तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील पशुपालक दयाराम साहेबराव ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन सरोगेटेड गाईंमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई व्यायल्या आहेत. येत्या दहा दिवसात उर्वरित सहा गाई विणार आहेत. आत्तापर्यंत आयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये केवळ ३५ ते ४० टक्के यश मिळाले होते. परंतु दयाराम ठेंगील यांच्याकडील गाईंमध्ये केलेल्या आयव्हीएफ प्रत्यारोपणात गाय गाभण राहण्याचे प्रमाण ८० टक्यांपर्यंत गेले आहे, हे तंत्रज्ञानाचे यश आहे, अशी माहिती जे के ट्रस्ट संस्थेचे मुख्य पशूतज्ज्ञ डॉ. श्याम झंवर यांनी सांगितले.

जातिवंत कालवडींची पैदास 
आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना डॉ.श्याम झंवर म्हणाले की, पाश्चिमात्य देशातील जातिवंत गाईंच्या पैदाशीसाठी वापरण्यात येणारे आयव्हीएफ तंत्रज्ञान हे भारतीय हवामान तसेच येथील गाई,म्हशींसाठी अनुकूल ठरणारे आहे. आमच्या जे के ट्रस्टच्या प्रक्षेत्रावरील ‘समाधी‘ या जातिवंत गीर दाता कालवडीपासून मिळविलेले दहा आयव्हीएफ भ्रूण ३० डिसेंबर,२०२० मध्ये दयाराम ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन जातीच्या सरोगेटेड गाईंमध्ये प्रत्यारोपीत करण्यात आले होते. यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. या तंत्रज्ञानात सेक्स सॉर्टेड सिमेन वापरल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये या गाई मादी वासरांना जन्म देणे अपेक्षित आहे.

‘समाधी‘च्या आईचे एका वेतातील दूध ३,५०० ते ४,००० लिटर आहे. आयव्हीएफसाठी ब्राझीलच्या ‘एस्पॅन्टो‘ या जगप्रसिद्ध गीर वळूचे सेक्स सॉर्टेड सिमेन वापरण्यात आले. या वळूच्या आईचे एका वेतातील दूध तेरा हजार लिटर आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार झालेल्या कालवडी जेव्हा दुधात येतील, तेव्हा त्या एका वेतामध्ये ४ ते ५ हजार लिटर दूध देणे अपेक्षित आहे.

आयव्हीएफ भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्पाबाबत डॉ.श्याम झंवर म्हणाले की,जेके ट्रस्ट ही पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणारी एक नामांकित स्वयंसेवी संस्था आहे. वडगाव रासाई (जि.पुणे) येथे संस्थेची अत्याधुनिक दर्जाची आयव्हीएफ आणि इ.टी.प्रयोगशाळा आहे. २०१६ मध्ये गीर आणि साहिवाल या दुधाळ देशी गायींपासून टेस्ट ट्यूब बेबी तयार करण्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत आमच्या प्रक्षेत्रावरील ‘समाधी‘ या उत्कृष्ट गीर दाता कालवडीपासून एकूण ७४ आयव्हीएफ गर्भधारणा यशस्वीरीत्या झाल्या. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० आयव्हीएफ गर्भधारणा पूर्ण होतील. या ७४ आयव्हीएफ गर्भधारणेपैकी ३० वासरांचा जन्म पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्यांसह देशाच्या विविध भागांतील पशुपालकांच्या गोठ्यात झाला आहे.

प्रतिक्रिया
प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा उत्कृष्ट देशी दुधाळ देशी गाईंची जलद गतीने वाढ करण्याचा आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन या योजनेशी अनुरूप आहे. एक गाय साधारणपणे तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त ८ ते १० वासरांना जन्म देऊ शकते. परंतु आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे एका वर्षात एका दाता गाईपासून मिळविलेल्या गुणवत्तापूर्ण भ्रूण प्रत्यारोपण सरोगेटेड गाईमध्ये करून ४० ते ५० मादी वासरे जन्माला येतील. हे तंत्रज्ञान देशी तसेच संकरित जातींच्या दुधाळ गाई तसेच म्हशींच्या पैदाशीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.आम्ही गुजरातमधील बन्नी जातीच्या म्हशीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.
-डॉ.श्याम झंवर, पशूतज्ज्ञ, ९८२१०६६९११

माझ्या गोठ्यात सध्या ६३ होल्स्टिन फ्रिजियन गाई आणि वासरे आहेत. त्यापैकी डिसेंबर,२०२० मध्ये माझ्याकडील दहा होल्स्टिन
फ्रिजियन गाईंमध्ये गीर जातीचे आयव्ही एफ भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. त्यापैकी आठ गाई या तंत्रज्ञानाने गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई नुकत्याच व्यायल्या असून त्यांना दोन गीर जातीची नर वासरे झाली. ही वासरे जेके ट्रस्ट ने पैदास कार्यक्रमासाठी नेली आहे. येत्या आठवड्यात उर्वरित सहा गाई विणार आहेत. माझ्या गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ होल्स्टिन फ्रिजियन गाई तयार करण्यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेन वापरून आयव्ही एफ भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामुळे गाईंची संख्या कमी ठेऊन दूध उत्पादन वाढेल. दूध विक्रीच्या बरोबरीने मला जातिवंत कालवडी विकसित करून शेतकऱ्यांना विकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

- दयाराम ठेंगील, ९७६३८५६५५८
तामखडा (ता.फलटण,जि.सातारा)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...