agricultural news in marathi Agalatia in goats, sheep | Agrowon

शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शिया

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. जयंत सुकारे
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

अगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते. वजन कमी होते. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात.
 

अगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते. वजन कमी होते. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात.

सांसर्गिक अगॅलेक्शिया हा आजार मुख्यत: मेंढ्यांमध्ये होतो. परंतु शेळ्याही या आजारास बळी पडतात. २०२१ मध्ये महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत आलेली साथीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे निश्‍चित निदान करण्यात आले. इतर भागांतही त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पशुवैद्यकांना तसेच पशुपालकांना या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. या आजारात बाधित शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते किंवा पूर्णतः बंद होते, व्यायलेल्या मेंढ्यांच्या पिलांना दूध न मिळाल्याने वाढ खुंटते, पिले दगावतात. वजनेही कमी होतात. या आजारासाठी लागणारा उपचाराचा खर्चही जास्त असल्याने हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आजार आहे.

कारणे 
हा जिवाणूजन्य आजार आहे. मुख्यत्वेकरुन मायकोप्लाझमा अगॅलेक्शियामुळे होतो.मायकोप्लाझमा प्रजातीच्या इतरही काही जिवाणूंचा संबंध या आजाराशी जोडला आहे.

प्रसार 

  • रोगग्रस्त मेंढ्या व शेळ्यांचे नाक, डोळ्यांतून येणारा स्त्राव, दूध, मूत्र, शेण व वीर्यातून जिवाणू शरीराबाहेर पडतात. हवा पाणी खाद्यास दूषित करतात.
  • दूषित पाणी, खाद्य आणि हवेतून हे जिवाणू तोंडाद्वारे, श्‍वसनातून आणि सडाच्या छिद्रामधून शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत १ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

लक्षणे 

  • आजाराच्या सुरुवातीला चारा कमी खाणे व न खाणे, सुस्त पडणे, कळपात चालताना मागे राहणे, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसतात
  • नंतर मात्र कासदाह, दूध कमी देणे किंवा न देणे, सांधे सुजणे, लंगडणे, डोळे पांढरट पडणे किंवा डोळ्यामध्ये पू होतो.
  • डोळ्यामध्ये किरॅटोंकजक्टायवाटीसमुळे आंधळेपणा येतो.
  • योग्य निदान व औषधोपचार न झाल्यास जनावर दिवसेंदिवस खंगून जाते. ते दगावण्याची शक्यता असते. कधी कधी तीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर विशेष लक्षणे न दाखवता अचानक दगाऊ शकते.

निदान 
लक्षणांवरून तसेच आजारी जनावरांपासून गोळा केलेले दूध आणि सांध्यातील पाणी या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून निश्‍चित निदान करता येते.

प्रतिबंध आणि उपाययोजना 

  • आजारास प्रतिबंध करण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या मेंढ्या व शेळ्यांना ताबडतोब कळपातून वेगळे करावे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जैवसुरक्षेच्या इतर मार्गाचा अवलंब करून त्याचा पुढील प्रसार टाळावा.
  • आजाराच्या नियंत्रणासाठी लस आपल्या देशात उपलब्ध नाही, परंतु आजारी जनावरांवर योग्य औषधोपचार झाल्यास आजार बरा होतो. यासाठी आजाराच्या सुरुवातीस निदान व उपचार होणे गरजेचे आहे.
  • ऑक्सीटेट्रासायक्लिन, टायलोसीन, फ्लुरोक्विनोलोजन (इनरोफ्लोक्सासीन, सिप्रोफ्लोक्सासीन इ.) क्लिडामायसीन या प्रतिजैवकांपैकी एक तसेच ताप व वेदना कमी करण्यासाठी औषण परिणामकारक आहेत. परंतु वरील औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच योग्य मात्रेत व योग्य कालावधीकरिता दिल्यास फायदा होतो.

संपर्क :
डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


इतर कृषिपूरक
जनावरांमधील रक्त संक्रमण फायदेशीरकावीळ झालेल्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या...
व्यावसायिक पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे...ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन करताना त्यांचे...
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...