नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : भुईमूग, हरभरा, मका, खोडवा ऊस
हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये काढणीसाठी परिपक्व होते. हरभरा पिकाची काढणी घाट्यामध्ये १४ ते १६ टक्के ओलावा असताना करावी, त्यामुळे नुकसान कमी होते.
हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये काढणीसाठी परिपक्व होते. हरभरा पिकाची काढणी घाट्यामध्ये १४ ते १६ टक्के ओलावा असताना करावी, त्यामुळे नुकसान कमी होते.
भुईमूग
रोप अवस्था जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी तसेच गवताचे व तणांचे नियंत्रण करण्यासाठी हात कोळप्याने कोळपणी करून घ्यावी.
हरभरा
- काढणी
- हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये काढणीसाठी परिपक्व होते. हरभरा पिकाची काढणी घाट्यामध्ये १४ ते १६ टक्के ओलावा असताना करावी, त्यामुळे नुकसान कमी होते.
हरभरा
- घाटे भरण्याची अवस्था
- पिवळी पडलेली रोगग्रस्त झालेली किंवा वाळलेली झाडे उपटून नष्ट करावी.
- ज्या ठिकाणी हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
- क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५० एससी) २ मि.लि. (एकरी २०० लिटर पाणी).
मका
- दाणे भरताना
- उगवणीनंतर ८-१० दिवसांनी खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
- डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५ मि.लि.
खोडवा ऊस
उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. फुटव्यांची एकूण संख्या वाढते. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच कार्बेन्डाझिम ०.१ टक्का (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे द्रावणाची फवारणी करावी. मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
पाचट व्यवस्थापन
ऊसतोडणी झाल्यानांतर उसाचे पाचट कुजविण्यासाठी पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया व १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू टाकावेत.
चवळी (चारा पीक)
- माव्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. मावा जास्त प्रमाणात असेल, तर फवारणी प्रति लिटर पाणी
- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि.
- फवारणीनंतर ७ दिवस जनावरांना हिरवा चारा घालू नये.
रब्बी ज्वारी
- काढणी
- पीक परिपक्व झाले असल्यास काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
कांदा
- फुलकिडे व करपा या कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
- डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि.
गहू
- दाणे
- मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास फवारणी
- थायामिथॉक्झाम (२५ डब्लूजी) ०.१ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी
मिरची
- मिरचीवरील रसशोषक फुलकिडे, पानावरील ठिपके इ. रोग आढळून आल्यास, त्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
- फिप्रोनील १.५ मि.लि. किंवा फेनपायरॉक्झिमेट (५ ईसी) १ मि.लि.किंवा फेनाक्झाक्विन (१० ईसी) २ मि.लि. अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.
संपर्क- ०२४२६ २४३२३९
(हवामान आधारित कृषी सल्ला, ग्रामिण कृषी मौसम सेवा व कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)