कृषी सल्ला (परभणी विभाग)

पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड तसेच पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करून पाणी व्यवस्थापन करावे. ​
Sigatoka disease on banana
Sigatoka disease on banana

पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड तसेच पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करून पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी ज्वारी

  • दाणे भरणे अवस्था
  • उशिरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव आढळल्यास व्यवस्थापनासाठी, डायमेथोएट (३० टक्के ईसी) १.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • गहू

  • निसवणी ते दाणे भरणे अवस्था
  • ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम
  • करडई

  • बोंड वाढीची अवस्था
  • उशिरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फवारणी प्रति लिटर पाणी
  • डायमेथोएट (३० टक्के) १.३ मि.लि. किंवा ॲसिफेट (७५ टक्के) १ ग्रॅम.
  • ऊस

  • वाढीची अवस्था
  • हंगामी ऊस पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राची दुसरी मात्रा ४० टक्के नत्र (१०० किलो नत्र प्रति हेक्टरी) देऊन पाणी द्यावे.
  • चिकू

  • फळवाढीची अवस्था
  • चिकू बागेत फळ गळ होऊ नये म्हणून बागेस पाणी द्यावे.
  • भाजीपाला

  • पुनर्लागवड
  • पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड तसेच पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करून पाणी व्यवस्थापन करावे.
  • केळी

  • घड बाहेर पडणे
  • ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • प्रोपीकोनॅझोल १ मि.लि.
  • पाऊस, वारा यामुळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
  • आंबा

  • मोहोर ते फळ लागणे अवस्था
  • ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे आंबा बागेत भुरी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • हेक्झाकोनॅझोल ०.५ मि.लि.
  • आंब्यामध्ये मोहोर फुलण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो फवारणी टाळावी, अन्यथा परागीकरणावर परिणाम होऊ शकतो.
  • तुडतुड्यांच्या व्यवस्थापनासाठी गरज पडल्यास निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. अथवा थायामेथोक्झाम (२५ टक्के) ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पाऊस, वारा यामुळे मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
  • संत्रा, मोसंबी काढणी अवस्था

  • पाऊस, वारा यामुळे बागेत पडलेली संत्रा, मोसंबीची फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर बोर्डो मिश्रणाची (१ टक्का) फवारणी करावी.
  • बागेत नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.३ मि.लि.
  • फळधारणा अवस्था आंबे बहर मोसंबी बागेत ४०० ग्रॅम नत्र प्रति झाड व आंबे बहर संत्रा बागेत ५०० ग्रॅम नत्र प्रति झाड खत मात्रा बांगडी पद्धतीने देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे. डाळिंब फुलोरा अवस्था पाऊस, वारा यामुळे बागेत मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. फळधारणा अवस्था आंबे बहर डाळिंब बागेत ३०० ग्रॅम नत्र प्रति झाड खतमात्रा बांगडी पद्धतीने देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला

  • काढणी अवस्था
  • मिरची पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • मायक्लोब्युटॅनिल (१० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम.
  • पाऊस, वारा यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा.
  • फुलशेती

  • काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, गॅलार्डिया फुलांची काढणी करून घ्यावी.
  • तुती रेशीम उद्योग

  • रेशीम कोषाचा ए-ग्रेड मिळवण्यासाठी कीटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
  • खाद्य म्हणून तुती पानात पाण्याचे प्रमाण ८० टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत ६ ते ७ दिवसांच्या, तर भारी जमिनीत १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • खत मात्रा :  वर्षातून कंपोस्ट खत २ वेळा द्यावे. जून व नोव्हेंबर महिन्यात ४ टन प्रत्येकी (एकूण ८ टन एकरी) द्यावे. यामुळे वर्षाकाठी एकरी २५ टन पानाचे उत्पादन मिळू शकते. दुसऱ्या वर्षापासून २५० अंडीपुंजांचे ५ ते ६ पिके घेता येतात. कोष उत्पादन २०० किलो झाल्यास ३०० रुपये प्रति किलो दर मिळाला तरी एका पिकाचे ६० हजार रुपये उत्पन्न हाती येते. वर्षामध्ये ५ पिकांतून ३ लाख रुपये उत्पन्न मिळवणे शेतकऱ्याला शक्य होऊ शकते.
  • पशुधन व्‍यवस्‍थापन

  • काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमध्ये उघड्यावर बांधलेल्या जनावराच्या शरीरावर जखमा झाल्या असल्यास, जखमांच्या स्वरूपानुसार पोटॅशिअम परमँगनेट किंवा आयोडीनच्या द्रावणाने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी.
  • गारपीटग्रस्त जनावरांना त्वरित सकस, प्रोटीन आणि ऊर्जायुक्त आहार पुरवणे आवश्यक असते. पाण्यातून क्षार, गूळ मिसळून द्यावा. तसेच ताण प्रतिरोधक औषधे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे (इम्यूनोस्टीम्यूलंट्स) पाण्यामधून तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत. नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधून पुढील उपचार करावेत.
  • - डॉ. कैलास डाखोरे, ०९४०९५४८२०२ (मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com