कृषी सल्ला (उन्हाळी भुईमूग, ऊस, करडई, उन्हाळी सूर्यफूल, गहू, मका, केळी)

रब्बी ज्वारी मध्ये पुढील लक्षणे दिसून येताच काढणी करावी. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटताना टंच असा आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो.
Use a perforated bag to cover the bunch of banana.
Use a perforated bag to cover the bunch of banana.

रब्बी ज्वारी मध्ये पुढील लक्षणे दिसून येताच काढणी करावी. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटताना टंच असा आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो.  उन्हाळी भुईमूग

  •  वाढीची अवस्था
  • उन्हाळी भुईमुगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस), आऱ्या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.
  • भुईमूग पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • मका

  • कणसे भरणे ते पक्वता अवस्था
  • कणसे लागण्याच्या अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या पुढे (१० टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे) दिसून आल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • मेटारायझिम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम किंवा नोमूरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी २ ग्रॅम.
  • ही फवारणी संध्याकाळी करावी.
  • ऊस

  • सुरू ऊस खत व्यवस्थापन
  • सुरू उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये विभागून ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत.
  • ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति हेक्टर)  १ ते ४ आठवडे :  नत्र ३० किलो, स्फुरद ९ किलो, पालाश ९ किलो ५ ते ९ आठवडे :  नत्र ७० किलो, स्फुरद ३२ किलो, पालाश १४ किलो १० ते २० आठवडे :  नत्र १०० किलो, स्फुरद ५१ किलो, पालाश ३२ किलो २१ ते २६ आठवडे :  पालाश ३७ किलो केळी

  • फळ धारणा
  • झाडे पडू नयेत म्हणून व वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपेलिनच्या पट्ट्यांच्या साह्याने झाडांना, घडांना आधार किंवा टेकू द्यावा.
  • घड ६ टक्के सच्छिद्रतेच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकावेत. यामुळे फुलकीड रोखण्यासाठी मदत होते.
  •  केळी बागेत काकडी, भोपळा, कलिंगड, खरबूज, तसेच मिरची, वांगी यांसारखी पिके घेणे कटाक्षाने टाळावे.
  • हरभरा

  • काढणी अवस्था
  • हरभरा पीक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करावी. मळणी करून घ्यावी. यानंतर धान्यास ६-७ दिवस कडक ऊन द्यावे.
  • हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुनिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
  • गहू

  • दाणे भरणे अवस्था / काढणी अवस्था
  • जिरायती गहू परिपक्व झाला असल्यास काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टरद्वारा करून घ्यावी.
  • बागायती गव्हास दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस) संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.
  • करडई

  • काढणी अवस्था
  • रब्बी करडई पिकाची काढणी कंबाईन हार्वेस्टरद्वारे करून घ्यावी.
  • करडईचे बियाणे पुढील हंगामात वापरावयाचे असल्यास पंख्याचा वेग ६०० ते ७०० आर. पी. एम. इतका ठेऊन धान्य स्वच्छ करून घ्यावे. उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.
  • उन्हाळी सूर्यफूल

  • पीक वाढीची अवस्था
  • आंतरमशागत :  पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
  • उन्हाळी सूर्यफूल पिकास उर्वरित ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एका महिन्याच्या आत द्यावी.
  • उन्हाळी सूर्यफुलाच्या पिकास संवेदनशील अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
  • सूर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था : १. रोप अवस्था २. फुलकळी अवस्था ३. फुलोऱ्याची अवस्था ४. दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. फुलकळी अवस्था ते दाणे भरणे अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात. उत्पादनात घट होते.
  • रब्बी ज्वारी

  • काढणीची अवस्था
  • रब्बी ज्वारी मध्ये पुढील लक्षणे दिसून येताच काढणी करावी. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटताना टंच असा आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो.
  • मळणी झालेले धान्य दोन ते तीन वेळा चांगले उन्हात वाळवावे. (धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी असावा.)
  • साठवणूक करताना त्यामध्ये १ ते २ टक्के वाळलेला कडुनिंबाचा पाला मिसळून साठवणूक करावी.
  • - डॉ. सूरज मिसाळ, ९४०५६६८१२८ (विषय विशेषज्ञ (कृषी हवामान शास्त्र), जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जिल्हा सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com