agricultural news in marathi agro advisory | Agrowon

कृषी सल्ला : कांदा, भुईमूग, हरभरा, गहू भाजीपाला

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
रविवार, 4 एप्रिल 2021

शेतीचे कामे करताना कामगारांना ४ ते ५ फुटांचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य  होईल आणि योग्य सुरक्षित अंतरही राखले जाईल.शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे.
 

शेतीचे कामे करताना कामगारांना ४ ते ५ फुटांचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य  होईल आणि योग्य सुरक्षित अंतरही राखले जाईल.शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे. पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करताना योग्यती खबरदारी/ काळजी घ्यावी.

पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पिकाना पाणी देताना आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.  शेतीचे कामे करताना कामगारांना ४ ते ५ फुटांचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य  होईल आणि योग्य सुरक्षित अंतरही राखले जाईल.शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे. पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करताना योग्य ती खबरदारी/ काळजी घ्यावी.

कांदा  (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

 • कांदा पिकांवर फुलकिडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि + टेब्युकोनॅझोल १ मिलि + स्टिकर १ मिलि
 • १० ते १५ दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे.

भाजीपाला

 • शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन करून ठिबकद्वारे पाणी द्यावे.
 • भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी
  (फवारणी : प्रतिलिटर पाणी)
  ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनील २.५ मिलि 

फळ पिके

 • नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे. 
 • फळबागेमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. ठिबकद्वारे पाणी द्यावे.

हरभरा, गहू

 • साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला मिसळावा  (१ क्विंटलकरिता २ किलो लिंबाचा पाला वापरावा).
 • साठविलेल्या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यातील ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील, अशी काळजी घ्यावी.

भुईमूग

 • शेंगा येण्याची अवस्था.
 • भुईमूग पिकाच्या नाजुक अवस्थे व्यतिरिक्त जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पीक पक्व होईपर्यंत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कार्नेशन : (फवारणी प्रतिलिटर पाणी)
लाल कोळी या किडीचे नियंत्रण करण्यासाठी ॲबामेक्टीन (१.८ टक्का प्रवाही) ०.४ मिलि

पशुसंवर्धन 

 • तापमान वाढत असल्याने उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे. 
 • जनावरांना हिरवा चारा देण्याची व्यवस्था करावी. पिण्यास थंड पाणी द्यावे.
 • उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा ओला चाऱ्याची उपलब्धतेसाठी ज्वारी किंवा बाजरी किंवा मका या पिकांची लागवड करावी. 
 • उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नयेत.  
 • गरजेनुसार हिरवा चारा, वाळलेला चारा व आंबवण तसेच २५ ते ३० ग्रॅम क्षार मिश्रण देणे अत्यंत गरजेचे आहे.

वेलवर्गीय पिके (टरबूज, काकडी)

 • वाढीची अवस्था
 • टरबूज आणि काकडीवर्गीय वेल पिकांमध्ये खालच्या पानांमध्ये नाग अळीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
 • ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
 • तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ कामगंध सापळे लावावेत.

-  ०२४२६-२४३२३९
(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...