कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिके

वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे जास्त पाणी पितात व खाद्य कमी खातात. याचा एकूणच जनावरांच्या वाढीवर, प्रजननावर व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.
use mulching in sugarcane crop.
use mulching in sugarcane crop.

वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे जास्त पाणी पितात व खाद्य कमी खातात. याचा एकूणच जनावरांच्या वाढीवर, प्रजननावर व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. सुरु ऊस 

  • वाढीची अवस्था
  • सुरू उसाचे पीक ४ महिन्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करून पीक तण विरहीत ठेवावे.
  • सुरू उसाची लागवड होऊन ६ ते ८ आठवडे झाले असल्यास, नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी १०० किलो (२२७ किलो युरिया) या प्रमाणात द्यावा. गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • उसाच्या सरीमध्ये हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावून जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो. तसेच सेंद्रीय खतांचा पुरवठा सुद्धा होतो.
  • साठविलेले धान्य 

  • साठविलेल्या धान्यात किडींचा प्रादुर्भाव मुख्यत्त्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्यावर अवलंबून असतो.
  • साठवणीसाठी धान्यातील ओलावा साधारणपणे १० टक्के पेक्षा कमी राहील, याची काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.
  • कांदा 

  • काढणी
  • रब्बी कांद्याचे पीक काढणी अवस्थेत असल्यास, ३ आठवडे आधी पिकाचे पाणी तोडावे.
  • फळ पिके 

  • वाढीची अवस्था
  • नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे.
  • फळबागांमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • पशुपालन व्यवस्थापन  वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे जास्त पाणी पितात व खाद्य कमी खातात. याचा एकूणच जनावरांच्या वाढीवर, प्रजननावर व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.

  • कोंबड्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने बारदान लावावे. छतावर वाळलेले गवत किंवा गव्हाच्या काडाचे आच्छादन करावे.
  • गोठ्याच्या छपरावर गवत, पाला, पाचोळा, नारळाच्या झावळ्या टाकून पाणी शिंपडावे. त्यामुळे गोठा थंड राहतो.
  • जनावरांना ३ ते ४ वेळा थंड व स्वच्छ पाणी पाजावे. गोठ्यात पाण्याची स्वतंत्र सुविधा केलेली असल्यास पाण्याचे भांडे सावलीत ठेवावे. पाण्याची भांडी माती किंवा सिमेंटपासून बनवलेली असावीत. जेणेकरून त्यात पाणी दिवसभर थंड राहील.
  • दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूणघास यासारखे पोषण वैरन द्यावी. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
  • संपर्क - ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com