कृषी सल्ला ( ​केळी, आंबा, सिताफळ,भाजीपाला )

आंबा बागेला पाण्याचा ताण बसू देऊ नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे आंबा कलमांच्या सुकलेल्या फांद्या काढून घ्याव्यात
खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे आंबा कलमांच्या सुकलेल्या फांद्या काढून घ्याव्यात

आंबा बागेला पाण्याचा ताण बसू देऊ नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी

  • फळ लागणे अवस्था
  •  नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. यामुळे कलमांची मर होणार नाही.
  • बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
  • केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
  • आंबा

  • फळ वाढीची अवस्था
  • आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात.
  • मुख्य खोडालगत भुस्सा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात. छिद्रामध्ये क्लोरपायरीफॉस द्रावणात (२ मि.लि. प्रति लिटर पाणी) भिजवलेला बोळा टाकावा. छिद्र शेण अथवा मातीने लिंपून घ्यावे.
  • या अवस्थेत आंबा बागेला पाण्याचा ताण बसू देऊ नये.
  • नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
  • सिताफळ

  • वाढीची अवस्था
  • सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोडालगत भुस्सा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात. छिद्रामध्ये क्लोरपायरीफॉस द्रावणात (२ मि.लि. प्रति लिटर पाणी) भिजवलेला बोळा टाकावा. छिद्र शेण अथवा मातीने लिंपून घ्यावे.
  • भाजीपाला

  • वाढीची किंवा काढणीची अवस्था
  • भाजीपाला पिकात सुक्ष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
  • काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.
  • भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • पायरीप्रॉक्सीफेन (५%) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५%) (संयुक्त कीटकनाशक) १ मि.लि. किंवा डायमेथोएट (३०%) १.३ मि.लि.
  • तुती रेशीम उद्योग

  • पट्टा पद्धतीने केलेल्या तुती लागवडीत आच्छादन, ठिबक सिंचन व यांत्रिकीकरण सोईचे जाते. याउलट सरी पद्धतीच्या तुती लागवडीत झाडांची प्रति हेक्टर संख्या कमी बसते.
  • पट्टा पद्धतीमध्ये एकरी १० गुंठे क्षेत्रालाच उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते. १.५ एकर इंच एक वेळा तुती बागेस प्रति एकर म्हणजे अंदाजे १ लाख ५० हजार लिटर पाणी एक वेळेस लागते. वर्षाकाठी ४५ लाख लिटर पाणी एकरी द्यावे लागते. ठिबक सिंचन केल्यास यात ४४ टक्क्यांपर्यंत बचत होते. पट्टा पद्धतीमध्ये आच्छादन केल्यास बऱ्यापैकी पाण्याची बचत होते. निंदणीच्या खर्चात बचत होते.
  • सामुदायिक विज्ञान

  • हिरव्या रंगाच्या भाज्या व फळे उदा. ब्रोकोली, काकडी, सिमला मिरची, वाटाणे, कोबी, वाल, शेवगा, आणि गवारीच्या शेंगा ही प्रतिकारशक्ती वाढवितात.
  • केसरी रंगाच्या भाज्या व फळे उदा. संत्री, गाजर, पपई, रताळे व भोपळा यांचा आहारात समावेश केल्यामुळे कर्करोग टाळण्यास मदत होत असल्याचे विविध वैद्यकीय संशोधनातून पुढे येत आहे.
  • - डॉ. कैलास डाखोरे (मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक), ९४०९५४८२०२ प्रमोद शिंदे (संशोधन सहयोगी), ७५८८५६६६१५ प्रा. डी. डी. पटाईत, (सहायक प्राध्‍यापक -कीटकशास्त्र), ७५८८०८२०४० (ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com