agricultural news in marathi agro advisory | Agrowon

कृषी सल्ला (सोयाबीन, तूर, भुईमूग,बाजरी )

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
गुरुवार, 10 जून 2021

पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश 
पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला 

 • शेतीचे कामे करताना मजुरांना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होइल आणि सुरक्षित अंतरही राखले जाईल. काम करताना तोंडाला मास्क अथवा कापड गुंडाळावे.
 • शेती यंत्रे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावीत.
 • सरासरी ६० ते ७५ मिलि पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

सोयाबीन 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम, काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी.
 • एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
 • वाण : जेएस-३३५, एम.ए.सी.एस-११८८, फुले कल्याणी (डीएस-२२८), जेएस-९३०५, केएस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६)

तूर 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकांकरिता योग्य असते.
 • चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते.
 • जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
 • वाण : विपुला, फुले राजेश्‍वरी, आयसीपीएल-८७, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७११, बीडीएन-७१६

भुईमूग 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
 • एक नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
 • वाण : एसबी-११, जेएल-२४ (फुले प्रगती), टीएजी-२४, जेएल-२२० (फुले व्यास), जेएल-२८६ (फुले उनप), टीपीजी-४१, टीजी-२६, जेएल-५०१, फुले आरएचआरजी-६०२१, फुले उन्नती, जेएल-७७६ (फुले भारती)

मूग व उडीद 

 • पेरणीची तयारी
 • मूग आणि उडीद पिकाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
 • पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन लागवडीस टाळावी.
 • चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे.

लागवडीसाठी वाण 

 • मूग : वैभव हा वाण खरिपासाठी उपयुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बी.पी.एम.आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत.
 • उडीद :  टी.पी.यू-४ आणि टी.ए.यू-१.

बाजरी 

 • पेरणीची तयारी
 • पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.
 • जमिनीचा सामू हा ६.२ ते ८ दरम्यान असावा.
 • हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
 • जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या
 • कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन किंवा १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे.
 • वाण  अ) संकरित : फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
 • ब) सुधारित : धनशक्ती

मका 

 • पेरणीची तयारी
 • मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीस निवडावी.
 • एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीची पूर्वमशागत करावी.
 • हेक्टरी १० ते १ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळून घ्यावे.
 • हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची आवश्‍यकता नसते.

सूर्यफूल 

 • पेरणीची तयारी
 • लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
 • आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
 • जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या उभ्या आडव्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.

संपर्क ः ०२४२६-२४३२३९
(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर कृषी सल्ला
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
कृषी सल्ला (कोकण विभाग)जोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले...
सोयाबीन उत्पादनवाढीचे तंत्रज्ञानसोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी...
कृषी सल्ला ( राहुरी विभाग)हवामान सारांश ः पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
आठवड्यात मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍...या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
नियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
फक्त पाच बोअरवेलवर गावाचे सिंचन...बंगालच्या उपसागराला जोडून असलेल्या आंध्र प्रदेश...
कोकणासह विदर्भात अतिवृष्टीची शक्‍यतामहाराष्ट्रावर आजपासून ते शनिवार (ता.१९)पर्यंत...
शेतकरी उत्पादक संस्थांसाठी डिजिटल...शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकता वाढविण्यासाठी सूत्रेसोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात...