agricultural news in marathi agro advisory | Agrowon

कृषी सल्ला (कपाशी, सोयाबीन, तूर, वांगी, हरभरा, कांदा, टोमॅटो)

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

रब्बीसाठी कोरडवाहू हरभरा पीक पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी. खरीप हंगामातील पीक काढणीनंतर काडीकचरा व धसकटे गोळा करून घ्यावीत. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी २० सप्टेंबरपासून पुढे करावी.
 

कपाशी

 • फुले उमलणे ते बोंड धरणे
 • बागायती क्षेत्रातील भारी जमिनीत विशेषतः रासायनिक खते व पाणी यांचे प्रमाण जास्त झाल्यास संकरित वाणाची कायिक वाढ जास्त होते. बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी पीक ८० दिवसांचे झाल्यावर मुख्य फांदीचा शेंडा खुडावा. यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित होते.

सोयाबीन

 • शेंगा सुटण्याची अवस्था
 • पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टोरा लिट्यूरा) अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत.
 • हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उघडीप मिळाल्यानंतर हिरव्या उंट अळीच्या व्यवस्थापनासाठी, प्रोफेनोफॉस (५०% प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

तूर

 • फांद्या फुटण्याची अवस्था
 • खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
 • वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच अशी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. वांझ रोगाचा प्रसार कोळी या कीटकामार्फत होतो. कोळी नियंत्रणासाठी कोळीनाशकाची फवारणी करावी.

हरभरा
रब्बीसाठी कोरडवाहू हरभरा पीक पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी. खरीप हंगामातील पीक काढणीनंतर काडीकचरा व धसकटे गोळा करून घ्यावीत. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी २० सप्टेंबरपासून पुढे करावी.

कांदा
फुलकिडे व करपा आढळून आल्यास, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ६ मि.लि. अधिक टेब्यूकोनॅझोल १० मि.लि. अधिक स्टिकर १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

टोमॅटो
रसशोषक किडींच्या नियंत्रणाकरिता, इमिडाक्लोप्रीड ५ मि.लि. किंवा थायामेथोक्‍झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

वांगी

 • वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण -
 • कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून एकदा खुडून नष्ट करावेत.
 • तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
 • अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१०% प्रवाही) १० मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ ईसी) १० मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ ईसी) ५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अधून-मधून निंबोळी अर्क (५ टक्के) ची फवारणी करावी.

०२४२६-२४३२३९
(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

 


इतर कृषी सल्ला
वनशेतीमध्ये चिंच लागवडकोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा...रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच...
भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापनकोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत...
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवाभारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते...
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...