agricultural news in marathi agro advisory | Agrowon

कृषी सल्ला (खरीप भात, चिकू, नारळ, हळद)

ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

भात खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सेंमीपर्यंत नियंत्रित करावी. फुलोरा अवस्थेतील निम गरव्या भात पिकास नत्र खताची तिसरी मात्रा ४३५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा द्यावी.

खरीप भात 

 • दाणे भरण्याची अवस्था (हळव्या जाती)
 • पोटरी ते फुलोरा अवस्था (निम गरव्या आणि गरव्या जाती)
 • भात खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सेंमीपर्यंत नियंत्रित करावी.
 • फुलोरा अवस्थेतील निम गरव्या भात पिकास नत्र खताची तिसरी मात्रा ४३५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा द्यावी.
 • हळवे भात दुधाळ अवस्थेत असताना लोंबीवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे.

नियंत्रण (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिलि किंवा
 • डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मिलि किंवा
 • इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मिलि

(टीप : ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)

चिकू 

 • फळधारणा
 • बागेतील गळून पडलेली अपरिपक्व, कीडग्रस्त फळे गोळा करून खोल जमिनीत गाडून टाकावीत.
 • एक वर्ष वयाच्या प्रत्येक कलमास शेणखत ५ किलो, युरिया १५० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ४५० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश १५० ग्रॅम याप्रमाणे खतांचा पहिला हप्ता द्यावा. खते कलमाच्या विस्ताराच्या आतमध्ये बांगडी पद्धतीने चरात देऊन चर बुजवून घ्यावा.
 • पहिल्या वर्षी दिलेली खतमात्रा दुसऱ्या वर्षी दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे वाढवून २० वर्षांपर्यंत २० पट या प्रमाणात द्यावी. वीस वर्षांनंतर प्रति कलमास १०० किलो शेणखत, ३ किलो युरिया, ९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची पहिला मात्रा द्यावी.

नारळ 

 • फळधारणा
 • पाच वर्षांवरील प्रति माडास ७५० ग्रॅम युरिया व ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची दुसरी मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. ही खतांची मात्रा ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट द्यावी.
 • याव्यतिरिक्त निंबोळी पेंड १० किलो आणि झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ग्रॅम प्रति माड याप्रमाणे वर्षातून एकदा द्यावी. ही मात्रा शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताच्या मात्रेसोबत देण्यात यावी.

हळद 

 • वाढीची अवस्था
 • लागवडीनंतर तीन महिन्यांनी नत्र खताची दुसरी मात्रा ८५० ग्रॅम युरिया प्रति गुंठा पावसाची उघडीप पाहून द्यावी. खते हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात टाकून मातीने झाकून घ्यावीत.

- (०२३५८) २८२३८७
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)


इतर कृषी सल्ला
ड्रॅगनच्या विळख्यातला ‘टोनले साप’एखादं भक्ष्य खाऊन फुगलेल्या सापाप्रमाणं दिसणारं ‘...
वनशेतीमध्ये चिंच लागवडकोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा...रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच...
भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापनकोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत...
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवाभारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते...
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....