agricultural news in marathi agromoney success stroy young farmer umesh pawar from sangli district doing profitable farming | Agrowon

प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण केले सक्षम

अभिजित डाके
सोमवार, 27 डिसेंबर 2021

मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी शेतीला व्यावसायिक दृष्टीत बदलले आहे. चिकू, आंबा, सीताफळ, पेरूसह पपई सारख्या फळ पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून दरवर्षी नव्या फळ पिकांची लागवड करतात. फळशेतीतून आपले अर्थकारण सक्षम केले आहे.
 

मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी शेतीला व्यावसायिक दृष्टीत बदलले आहे. चिकू, आंबा, सीताफळ, पेरूसह पपई सारख्या फळ पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून दरवर्षी नव्या फळ पिकांची लागवड करतात. फळशेतीतून आपले अर्थकारण सक्षम केले आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव हे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनाचे माहेरघरच. याच तालुक्याच्या पूर्व भागात मांजर्डे गाव. हेही तसे दुष्काळीच. आजही येथील लोकांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. गावात आजही काही प्रमाणात द्राक्ष बागा डोलत आहेत. द्राक्ष पिकाबरोबर ऊस पीकही इथे दिसते. याच गावातील बाबासाहेब पवार आणि त्यांचा मुलगा उमेश हे दुष्काळाशी झगडत आहेत. बाबासाहेब, त्यांच्या पत्नी सौ. बबूताई, मुलगा उमेश, सून सौ. जया, नातवंडे हर्षवर्धन आणि स्वरांजली असे हे छोटे कुटुंब. बाबासाहेब पेशाने शिक्षक. तशीच उमेशलाही शिक्षणाची फार आवड. त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि शिक्षणशास्त्र अशा तीनही विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. २०११ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीत रस नव्हता. त्यामुळे नसल्याने त्यासाठी कधी प्रयत्नच केले नाहीत. परिस्थिती मध्यमच असली तरी स्वास्थ गमावून पैसा मिळवण्यापेक्षा शेती करण्याचा निर्णय घेतला. तीही फळबाग करण्याचे ध्येय ठेवले. त्यात कुटुंबीयांनीही साथ दिली. प्रथम प्रायोगिक तत्त्वावर काही झाडे लावून त्यात ‘मास्टरी’ मिळवायची, मग लागवड वाढवायची ही त्यांची पद्धत. द्राक्ष बागेपासून सुरुवात करत केसर आंबा, चिकू, सीताफळ, पेरू अशी फळपिके घेत आहेत.

द्राक्षापासून सुरुवात
गावात प्रामुख्याने द्राक्ष बागा होत्याच. त्यामुळे २००१ मध्ये द्राक्ष लागवड केली. द्राक्ष शेती ही खरेतर निसर्गाच्या लहरीवर अवलंबून. सातत्यपूर्ण प्रयत्नातून द्राक्षाचे चांगले उत्पादन हाती येत होते. याच दरम्यान, केशर आंब्याची ५० कलमे लावली. आंबा पीक पवारांना तसे नवीनच. त्यामुळे ते समजून घेत, अभ्यास व प्रयोग करत ते शिकत गेले. आंबा बाग स्थिरावत गेली. पण दुष्काळाच्या संकटाने द्राक्ष बाग झाकोळून गेली. त्यामुळे द्राक्ष बाग काढावी लागली. मात्र कोरडवाहू शेती कोणत्याच अर्थाने परवडणारी नाही, हे दिसत होते. आंब्यातून फळ पिकांचा सुरू झालेला अभ्यास कधीच थांबला नाही. बहुवार्षिक फळबागेचे क्षेत्र वाढवण्याचा ध्यास घेतला.

आंब्याच्या सोबतीला चिकूची लागवड
सन २००७ पासून नवी चिकू लागवड करतानाच आंबा लागवड क्षेत्र वाढवले. चिकू व्यवस्थापनाचे धडेही स्वतःच गिरवले. त्यातही प्रयोग, अभ्यास करत राहिले. पुढे सीताफळ, पेरू अशा फळांचीही लागवड केली. याविषयी माहिती देताना उमेश सांगतात, की शेतीतून चांगले उत्पन्न मिळवणे, ही एक बाब. ती व्यवस्थित गुंतवणे ही दुसरी बाब. दोन्ही महत्त्वाचे. मी अन्य कोणत्याही गुंतवणुकी करण्यापेक्षा शेतीत सुधारणेसाठी वापरतो. दरवर्षी मिळणाऱ्या नफ्यातून किमान १५ टक्के रक्कम ही शेतीत नवे पीक, त्याचे प्रयोग यासाठी हमखास बाजूला ठेवतो. फळ लागवड करण्यापूर्वी फळांसाठीची बाजारपेठ, बाजारपेठेत कधी आणि कशी मागणी आहे, याचाही सर्व बाजूंनी अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो.

आंब्याची हात विक्री ठरली फायदेशीर
बाजारपेठेत आंबा विक्री करणे तसे जिकिरीचे. त्यासाठी स्वतः ऊस पट्ट्यात म्हणजे भिलवडी, नांद्रे या भागात विक्री सुरू केली. गुणवत्ता आणि दर्जा यामुळे मागणी वाढत आहे. ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. अनेक ग्राहक कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. आंब्याचा हंगाम सुरू झाल्यावर ग्राहकाकडून फोनवरून ऑर्डर यायला सुरू होतात. मागणीनुसार त्यांच्या गावात दर्जेदार आंबे पोहोच केले जात असल्याने ग्राहकांची संख्या वाढली. उत्तम गुणवत्ता आणि दरात तडजोड न करता एकच दर, ही पद्धत ठेवली आहे.

शेतीतून मिळणाऱ्या निव्वळ नफ्याची विभागणी

 • शिक्षण, घरखर्च आणि आरोग्यासाठी ः २० टक्के.
 • पुढील वर्षीच्या फळबागेसाठी पिकासाठी ः २० टक्के.
 • घेतलेल्या शेतीच्या सुधारणा, विकासासाठी ः २० टक्के.
 • नवीन अवजारांसाठी ः १० टक्के.
 • वैयक्तिक विमा ः १५ टक्के.
 • आणीबाणीच्या प्रसंगासाठी ः १५ टक्के.
 • एकूण शेती ः १० एकर
 • चिकू ः अडीच एकर ः २०० झाडे
 • आंबा ः एक एकर ः ३०० झाडे
 • सीताफळ ः दोन एकर ः ६०० झाडे
 • कोरडवाहू : साडे चार एकर गहू, ज्वारी, हरभरा

फळे व वाण

 • आंबा : केसर
 • चिकू : काली पत्ती
 • सीताफळ : फुले पुरंदर आणि बाळानगर
 • पेरू : जी विलास

फळ ... उत्पादन प्रति झाड ... मिळणारा सरासरी दर प्रति (उत्पादन व दर किलो)
चिकू ... ८० ... ३० ते ६०
आंबा ... ३० ... ६० ते ८०
पेरू ... २० ... १५ ते २०
सीताफळ ... १० किलो ... ४० ते ७०

एकरी सरासरी उत्पादन

 • आंबा : ६ टन
 • चिकू : ६ टन
 • पेरू : ६
 • ३ वर्षांचे सीताफळ : २ टन
 • ४ वर्षांचे सीताफळ : ३ टन

आंब्यातून अडीच लाख उत्पन्न, तर निव्वळ नफा २ लाख रु.
चिकूमधून दोन लाख उत्पन्न, तर निव्वळ नफा १.६० लाख रु.

चिकूची रोज २०० ते ५०० किलोपर्यंत काढणी. त्याची विक्री सांगली येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये.आंब्याची प्रामुख्याने स्वतः विक्री करण्यावर भर.

पवार यांच्या नियोजनाची वैशिष्ट्ये 

 • फळपिकांबाबत विविध प्रगतिशील शेतकरी, राहुरी, दापोली येथील दोन्ही विद्यापीठांच्या, तसेच सासवडसह अन्य फळ संशोधन केंद्रांच्या संपर्कात राहून सातत्याने माहिती मिळवली जाते. त्याचा शेतामध्ये उपयोग केला जातो.
 • जास्त उत्पादन घेण्यापेक्षाही दर्जेदार उत्पादन घेण्यावर भर. अतिरिक्त उत्पादन घेतले तर झाडाची उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे उत्पादन स्थिर ठेवले आहे.
 • नवे पीक शोधणे, त्यांचे प्रयोग करणे ही आवड. सीताफळ आणि पेरूची नवीन लागवड.
 • झाडांचा घेर आणि उंची सारखी ठेवण्यासाठी छाटणी व अन्य व्यवस्थापनावर भर. यामुळे फळ काढणी सोपी होते.
 • फळांची काढणी व पॅकिंगमध्ये घरातील सदस्यांची मदत. त्यामुळे काळजीपूर्वक काम शक्य होते.
 • फळे स्वतः विक्रीला घेऊन जाण्यावर भर. त्यामुळे बाजाराची मागणी व आवश्यकता लक्षात येते. स्वतः हजर असल्याने फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

- उमेश बाबासाहेब पवार, ९४२१३६१७७८


फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज...२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (...
सोयाबीनः सावध, ऐका पुढल्या हाका जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
कापूस वायदा सरकारी रडारवरदेशात ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत एकंदर नऊ कृषी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
cotton market: पांढरं सोनं उद्योगाच्या... पुणे ः कापसाचे दर वाढल्याची हाकाटी पिटत कापड...
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १...देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट...
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडेनागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
साखर उत्पादनाची शतकी मजलकोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू...
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवरकमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे -...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
देशातील तूर उत्पादनात मोठी घटपुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग,...
खर्चात बचत हाच नफ्याचा पायानांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा...
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...