पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूध

सोया दूध
सोया दूध

सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व अन्य जीवनसत्त्वे व खनिज असतात. सोयाबीनवर योग्य प्रकारे प्रक्रिया करून सोयाबीनचे पौष्टिक दूध तयार करता येते. एक किलोग्रॅम सोयाबीनपासून ७-८ लिटर सोया दूध तयार होते. सोयाबीनचे दूध तयार करण्यासाठी फक्त दहा रुपये प्रति लिटर इतका खर्च येतो व ते २० रुपये प्रति लिटर विकले तरी गायी म्हशीच्या दुधाच्या (४० रु. लिटर) तुलनेत फक्त अर्ध्या दरात उपलब्ध होऊ शकते. सोया दूध गाईच्या दुधाच्या समकक्ष पौष्टिक असूनही स्वस्त दरात मिळू शकते. सोया दुधापासून दही, ताक, लस्सी, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम, आम्रखंड इ. पदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून दूध तयार करण्याच्या पद्धतीमध्ये जे उपपदार्थ मिळतात त्याचाही उपयोग चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ, उदा. गुलाबजामून, शिरा, भजी, केक इ. तयार करण्यासाठी होतो. सोयाबीनपासून दूध व अन्य पदार्थ बनवून चांगला फायदा मिळवता येतो. सोया दूध तयार करण्याची पद्धत

  • चांगल्या गुणवत्तेचे सोया दूध तयार करण्यासाठी काळजीपूर्वक सर्व प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.  
  • सोयाबीनचे टरफल काढून डाळ तयार करावी. सोयाडाळ ६ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी.
  • भिजलेली डाळ गरम पाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
  • तयार झालेले बारीक मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत उकळून कपड्यातून गाळून घ्यावे.
  • गाळल्यानंतर सोया दूध मिळते व कपड्यामध्ये जो चोथा राहातो तो ओकारा असतो.
  • सोया दुधापासून साेया पनीरही बनविता येते.   
  • संपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४ (लेखक प्रक्रिया तंत्रातील तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com