agricultural news in marathi Approval of fund for farmer producer company | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपनीसाठी समभाग निधी मंजुरी

मिलिंद आकरे, सचिन सरसमकर
शुक्रवार, 19 मार्च 2021

शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल. संस्थात्मक भागधारक (उदा.शेतकरी उत्पादक कंपनी) त्यांचेसाठी एक लाख एवढे असेल.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल. संस्थात्मक भागधारक (उदा.शेतकरी उत्पादक कंपनी) त्यांचेसाठी एक लाख एवढे असेल.

 • शेतकरी उत्पादक कंपनीस समभाग भांडवलाची रक्कम ही कमाल दोन हप्त्यात काढता येते. पहिला हप्ता अर्ज केल्यापासून २ वर्षाच्या आत आणि कमाल मर्यादा १५ लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी आहे. जर शेतकरी उत्पादक कंपनीने पहिल्या हप्त्यात १० लाखापेक्षा कमी भाग भांडवल घेतले असेल, पण उत्पादक कंपनीने आपली सभासदांची संख्या वाढवून भागभांडवल कमाल मर्यादा १५ लाख इतके उभे केल्यास दुसऱ्या हप्त्यासाठी केलेला अर्ज हा नवीन अर्जाप्रमाणे गृहित धरला जातो. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते.
 • मंजुरीच्या अटी स्वीकारल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी छोट्या शेतक-यांच्या कृषी व्यापार संघाशी करारबद्ध होईल.
 • मंजूर निधीची रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. मंजूर झालेल्या समभाग निधीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीने समभाग निधीच्या प्रमाणात प्राप्त झालेले अधिकचे समभाग हे ४५ दिवसांपर्यंत समभागधारकांच्या नावावर जमा करणे आवश्यक असते.
 • शेतकरी उत्पादक कंपन्यांनी समभाग निधी अंतर्गत प्राप्त झालेली रक्कम ही भागधारकाच्या नावे जमा केल्याचे प्रमाणपत्र छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाला कळविणे आवश्यक आहे.
 • शेतकरी उत्पादक कंपनीशी झालेल्या करारान्वये छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ, नवी दिल्ली हे भागधारकांच्या खात्यावरील समभाग निधीची माहिती तपासू शकते.
 • शेतकरी उत्पादक कंपनीने छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाबरोबर लेखी करार केल्यानंतरच समभाग निधी योजनेच्या अंतर्गत अर्थ साहाय्य वितरण करण्यात येते.
 • याबाबत कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन किंवा करारनाम्यातील अटी व शर्थीचे अनुपालन न केल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ हे समभाग निधीचा योजनेची रक्कम परत मागावू शकते व ते कंपनीवर बंधनकारक राहील. छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ (योजनेच्या मर्यादेत) कायदेशीर कारवाई करू शकते.

कार्यपद्धती 
प्रत्येक भागधारकास एक समभाग प्राप्त व्हावा यासाठी भागधारकांच्या चालू भाग भांडवलाच्या समभाग वाटप करण्यात येते. परंतु मंजूर समभागनिधीची रक्कम ही जर सर्व भागधारकास किमान एक समभाग मिळण्या इतकी अपुरी असल्यास समभाग निधीचे वाटप हे समभागधारकाच्या चालू जमीन धारणे एवढे करावे लागते. परंतु त्यासाठी कमीत-कमी जमीन धारकाच्या वाटपापासून सुरुवात करण्यात यावी. यासाठी पारदर्शक पध्दतीचा अवलंब करावा की ज्यामुळे भागधारकाची ओळख अगोदर कळणार नाही.

योजनेचे फायदे

 • पात्रता धारक शेतकरी उत्पादक कंपनीस त्यांच्या एकूण समभागा एवढा निधी या योजने अंतर्गत मिळण्यास मदत होते. तसेच नोंदणीकृत झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यांचे भागभांडवल अर्ज केलेल्या तारखेस जास्त नाही अशा कंपन्यांना प्राधान्य देण्यात येते. यामुळे अशा कंपन्यांची भांडवली पत विस्तारण्यास मदत होते. 
 • समभाग निधी हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांने धारण केलेल्या समभागा इतकाच व त्याची कमाल रक्कम १५ लाख प्रति शेतकरी उत्पादक कंपनी इतकी असते. 
 • समभाग निधीची रक्कम ही थेट शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. समभाग हे भागधारकांच्या वर्ग करणे अनिवार्य असते.

लवाद

 • छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व त्या अंतर्गत अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास तसेच समभाग निधी योजने अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचा गैरवापर झाल्यास किंवा अफरातफर केल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ तो सर्वच्या सर्व निधी परत घेण्यास व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सक्षम आहे.
 • छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेतील करार हा प्रचलित कायद्यानुसार करण्यात येईल. या करारा बाबत काही विवाद किंवा दावे निर्माण झाल्यास किंवा कराराचा भंग झाल्यास किंवा मोडल्यास, कायदेशीर पद्धतीने व दिल्ली स्थित लवादाच्या निर्णयाच्या निकालानुसार सोडविण्यात येईल. तथापि, कोणतीही कायदेशीर कृती करण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न व चर्चेतून सर्व समावेशक समझोता शोधणे आवश्यक राहील.
 • सदरील योजनेचा शेतकरी उत्पादक कंपनीस लाभ मिळविण्याच्या दृष्टीने करावयाचे अर्ज व तत्सम बाबींचे महामंडळाकडून सशुल्क सेवा पुरविली जात आहे. याबाबत आपण महामंडळाशी संपर्क साधावा.
 • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे एकमेव सरकारी संस्था आहे की, जे शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करून देते. ज्या शेतकऱ्यांना नवीन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावयाचे आहे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत महामंडळाकडून केली  जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी चे वर्षभराचे सर्व कागदोपत्री पूर्तता एकाच छताखाली मोफत दिली  जाणार आहे.

- गणेश जगदाळे,  ७५८८०७०४७३
( व्यवस्थापक नाबार्ड पोपी प्रकल्प, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे.)


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...