सुपारी सोलणी यंत्राबाबत माहिती...

सुपारी सोलणी यंत्र
सुपारी सोलणी यंत्र

सुपारी फाळसटणी यंत्र

  • या यंत्रामध्ये एक साधारण ड्रम असून, त्यावर दुसरा ड्रम बसविला आहे. बाहेरील ड्रम हा स्थिर असून, आतमधील ड्रम फिरतो.
  • हा ड्रम फिरविण्यासाठी यंत्राला विद्युत मोटार किंवा हॅंडल दिले आहे. वरच्या बाजूला असलेल्या हॉपरमधून ओल्या सुपाऱ्या घातल्या, की आतील ड्रम फिरला जाऊन सुपाऱ्या दुसऱ्या बाजूने फाळसटणी होऊन बाहेर पडतात.
  • ड्रमवरील अडकण्यांमुळे ओल्या सुपारीचे बाहेरील आवरण हे फाटले जाऊन आतमधील तंतू बाहेरील वातावरणाची संपर्क झाल्यामुळे वाळवणीचा कालावधी कमी होतो.
  • यंत्राची वैशिष्ट्ये
  • यंत्र मोटारचलित व मनुष्यचलित अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहे.
  • सुपारीच्या ९० ते ९५ टक्के भागावर फाळसटणी केली जाते.
  • ताशी साधारण १६०० सुपाऱ्यांची फाळसटणी होते.
  • फाळसटणी केलेली सुपारी व यांत्रिक फाळसटणी केलेली सुपारी यांच्या प्रतवारीमध्ये काहीही फरक नसतो. वाळवणीच्या कालावधीमध्ये ५० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते.
  • सुपारी सोलणी यंत्र

  • हे यंत्र हाताने चालविता येते. यंत्रामध्ये स्क्रू व सिलेंडरची यंत्रणा केली असून, त्यामध्ये पाते बसविलेले आहेत.
  • यंत्रातील स्क्रूच्या बरोबर मध्ये सुपारी टाकली आणि यंत्राचा दांडा फिरविला, की सोललेली सुपारी व सोलण बाहेर येते.
  • यंत्राची वैशिष्ट्ये

  • यंत्र छोट्या सुपारी बागायतदारांकरिता उपयुक्त आहे.
  • यंत्र चालविण्याकरिता अतिशय सोपे व सहज आहे.
  • यंत्र छोटे असल्याने हव्या त्या ठिकाणी यंत्राची ने-आण करता येते.
  • ६ ते ८ टक्के आर्द्रता असलेल्या प्रतवारी केलेल्या सुपारीची निवड सुपारी सोलणी मशिनकरिता करावी.
  • यंत्राद्वारा सोलण्याची क्षमता ४ ते ५ किलो प्रतितास असून, या यंत्रामधून सुपारी फुटीचे प्रमाण सरासरी १० ते १४ टक्के व ओलसर सुपारी न सोलता बाहेर पडण्याचे प्रमाण ४ ते ६ टक्के आढळून आले.
  • प्रतवारी केलेली सुपारी सोलणीसाठी यंत्राची कार्यक्षमता ८० ते ८५ टक्के आहे.
  • संपर्क : ०२३५८- २८४०९० (कृषी यंत्रे व शक्ती विभाग,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com