agricultural news in marathi article regarding backyard poultry farming | Page 2 ||| Agrowon

परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य व्यवस्थापन

डॉ. एम. आर. वडे
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. या कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या असल्याने त्यांना उरलेले खाद्य, तांदूळ किंवा गहू यांचा भरडा अशा प्रकारचे खाद्य देता येते. परसबागेत साधारणपणे २० ते २५ कोंबड्या पाळता येतात.

परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. या कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या असल्याने त्यांना उरलेले खाद्य, तांदूळ किंवा गहू यांचा भरडा अशा प्रकारचे खाद्य देता येते. परसबागेत साधारणपणे २० ते २५ कोंबड्या पाळता येतात.

भारतातील एकूण अंडी उत्पादनापैकी २१ टक्के उत्पादन हे परसबागेतील देशी कोंबड्यांपासून मिळते. खेड्यांमध्ये देशी कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, परसबागेतील कोंबड्यांना विशेष आहार दिला जात नाही. म्हणून त्यातून फारच कमी अंडी उत्पादन मिळते. हे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित देशी कोंबड्यांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. या कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या असल्याने त्यांना उरलेले खाद्य, तांदूळ किंवा गहू यांचा भरडा अशा प्रकारचे खाद्य देता येते. परसबागेत साधारणपणे २० ते २५ कोंबड्या पाळता येतात.

देशी कोंबड्या 
जाती
असील, कडकनाथ, बसरा, डेनकी, घागस, निकोबारी, मिरी, ब्रह्मा, काश्मिरी फेओरेला, पंजाब ब्राऊन, अंकलेश्‍वर, चटगाव.

 • या जातींपासून मिळणारे मांस अतिशय रुचकर असते.
 • या कोंबड्यापासून वर्षाकाठी ५० ते ६० अंडी मिळतात. साधारणपणे ५ ते ६ महिन्यांत १ किलो मांस उत्पादन मिळते. हे उत्पन्न अतिशय कमी आहे. उत्पन्न वाढविण्याकरिता, सुधारित देशी कोंबड्यांचे संगोपन करायला पाहिजे.

सुधारित जाती 
या कोंबड्यापासून वर्षाकाठी किमान १५० ते १६० अंडी आणि २ ते ३ महिन्यांत १ किलो मांस मिळते.

सुधारित जाती...............वार्षिक अंडी उत्पन्न
स्वर्णधारा.........................
१९०-२००
ग्रामप्रिया..........................२००-२१०
ग्रामलक्ष्मी.........................१९०-२००
वनराजा...........................१६०
गिरिराज...........................१७०
श्रीनिधी.............................१८०-२००
नर्मदानिधी.........................१८०
प्रतापधन............................१६१
कामरूपा...........................१२०-१३०
कॉरी देवेंद्र...........................१८०-१९०

निवारा 

 • २० कोंबड्यांच्या निवाऱ्यासाठी साधारणतः ६ बाय ६ चौरस फूट जागा आवश्यक असते.
 • पक्षी घराची उंची ३ ते ३.५ फूट असावी. जमिनीपासून १.५ ते २ फूट असावी. जेणेकरून पावसाळ्यात ओलावा निर्माण होणार नाही.
 • बांबू, गवत, विटा, जुने टिनाचे पत्रे, तार, कौल यांचा वापर करून पक्षीघर तयार करावे.
 • पक्षिघरामुळे कोंबड्यांचे ऊन, वारा, पाऊस तसेच कुत्रे, मांजर आणि इतर जंगली प्राण्यांपासून संरक्षण होते.

लहान पिलांची काळजी 

 • नवजात पिलांची सुरुवातीच्या काळात योग्य काळजी घेणे खूप आवश्‍यक असते. योग्य काळजी न घेतल्यास लहान पिलांची मरतुक होऊ शकते.
 • पहिल्या चार आठवड्यात ब्रूडिंग व्यवस्थापन महत्त्वाचे असते. ब्रूडिंग नैसर्गिक व कृत्रिम पद्धतीने करता येते.
 • नैसर्गिक पद्धतीत कोंबडी लहान पिलांना आपल्या पंखाखाली तापमान देते. तर कृत्रिम पद्धतीत बाहेरून तापमान दिले जाते.

कृत्रिम ब्रूडिंग व्यवस्थापन 

 • वीज, गॅस, रॉकेल, लाकूड, भुसा इत्यादींच्या मदतीने कृत्रिम उष्णता पुरविली जाते.
 • पक्षी ब्रूडरपासून लांब जाऊ नये म्हणून ४५ सेंमी उंचीचा चीक गार्ड गोलाकार पद्धतीने ठेवावा. ३ ते ५ सेंमी जाडीची गादीचा थर द्यावा. भाताची तूस, शेंगदाण्याची टरफले, लाकडाचा भुसा, सोयाबीनचा कुठार इ. गादी म्हणून वापरावी.
 • पहिल्या आठवड्यात ९५ फॅरेनहाइट (३५ अंश सेल्सिअस) एवढे तापमान द्यावे. आणि पुढील प्रत्येक आठवड्यात तापमान ५ फॅरेनहाइट ने कमी करावे. हे तापमान ६ आठवड्यांपर्यंत ७० फॅरेनहाइट (२१ अंश सेल्सिअस) पर्यंत कमी केले जाऊ शकते.
 • योग्य तापमान मिळण्याकरिता प्रति लहान पक्षी २ वॉट एवढे तापमान देणे गरजेचे आहे.

खाद्य व्यवस्थापन 

 • पहिल्या दोन आठवड्यांसाठी लहान पिलांना संतुलित आहार (फ्री-स्टार्टर किंवा स्टार्टर) द्यावा. यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, शेंगदाण्याची पेंड इत्यादीचा समावेश होतो.
 • दोन आठवड्यांपासून हळूहळू श्रेणीबद्ध पातळीवर दररोज ५ टक्के फ्री स्टार्टर पक्ष्यांच्या आहारात समाविष्ट करता येतो. आणि ५ व्या ते ६ व्या आठवड्यापर्यंत फ्री-स्टार्टर हे स्थानिकरीत्या उपलब्ध खाद्य सामग्रीद्वारे पूर्णपणे बदलले पाहिजे. (किंवा सहा आठवड्यांपर्यंत संतुलित आहार प्रति पक्षी दररोज १५ ते २५ ग्रॅम द्यावे).
 • सहाव्या आठवड्यानंतर, पक्षी अंगणात पडलेले खाद्य वेचून खाण्यास सक्षम होतात. पक्षी परसबागेतील कीटक, अळ्या, गांडूळ, माश्या, मातीतील जंतू खाऊन त्यांची प्रथिनांची गरज भागवतात. परंतु बाजरी, तांदूळ, नाचणी यापैकी जे खाद्य उपलब्ध असेल ते द्यावे.
 • दररोज प्रति पक्षी १५ ते २० ग्रॅम खाद्य सकाळी आणि संध्याकाळी द्यावे. अझोला ३ ते ५ ग्रॅम, शेवग्याची पाने २ ते ३ ग्रॅम, उरलेली अळिंबी २ ग्रॅम प्रति पक्षी याप्रमाणे देता येईल.
 • पक्षी १५ आठवड्यांचे झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त कॅल्शिअमचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यासाठी खाद्यातून शिंपले किंवा चुना पावडर २ ते ३ ग्रॅम प्रति पक्षी याप्रमाणे द्यावे.
 • पक्षी २० आठवड्यांचे झाल्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. त्या वेळी २० ते ३० ग्रॅम संतुलित खाद्य आणि ५ ग्रॅम शिंपले दररोज द्यावे.

चोच कापणे 
अंडी उत्पादनासाठी पाळलेल्या कोंबड्यांची चोच वयाच्या दुसऱ्या व १४- १५ व्या आठवड्यात कापावी.

प्रकाश 
प्रकाश शारीरिक क्रियाकलाप, चयापचय दर आणि इतर शारीरिक कार्यावर उत्तम परिणाम करतो. पहिले ६ आठवडे पक्ष्यांना २३ तास प्रकाश व १ तास अंधार द्यावा. ९ ते १७ आठवड्यांत १२ ते १४ तास प्रकाश द्यावा. आणि २० आठवड्यांनंतर १६ तास प्रकाश द्यावा.

गादी व्यवस्थापन 

 • तांदूळची तूस, लाकडाचा भुसा शेंगदाण्याची टरफले इत्यादी गादी म्हणून वापरावी.
 • गादीची जाडी ५ सेंमी असावी.
 • आर्द्रता २४ टक्के असावी. त्यापेक्षा जास्त आर्द्रता झाल्यास बुरशीजन्य रोग होऊ शकतात.
 • गादी दर तीन दिवसांनी खालीवर करावी.

पाणी व्यवस्थापन 
पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करावे.

आरोग्य व्यवस्थापन 

 •  परसबागेतील कुक्कुट पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी खाद्यासाठी फिरतात. त्यामुळे विविध रोगांची बाधा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांना विषाणूजन्य रोग जसे राणीखेत, मारेक्स, गम्बोरो रोगप्रतिबंधात्मक लस द्यावी. लसीकरण वेळापत्रक तंतोतंत पाळावे.
 •  दर ३ ते ४ महिन्यांच्या अंतराने जंतनिर्मूलनाचे औषध द्यावे. त्यामुळे पक्षी निरोगी आणि जंतमुक्त राहतात.
 • जंतुनाशकांचे स्प्रे मारून पक्ष्यांचा वावर असलेला परिसर निर्जंतुक करावा.
 • अंडी देणाऱ्या काळामध्ये पक्ष्यांना रानीखेत या रोगासाठी प्रत्येक ६० ते ९० दिवसांच्या अंतराने लसीकरण करावे.

- डॉ. एम.आर. वडे, ८६००६ २६४००
(सहायक प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...