agricultural news in marathi article regarding carp fish seeds | Agrowon

कार्प माशांच्या बीजांचे संगोपन

डॉ. अजित चौधरी, डॉ. सचिन खैरनार
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

माशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य आकाराच्या मत्स्य बीजाची गरज असते. यासाठी योग्य व्यवस्थापणातून शाश्वत मत्स्यबीज उत्पादन करावे.
 

माशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य आकाराच्या मत्स्य बीजाची गरज असते. यासाठी योग्य व्यवस्थापणातून शाश्वत मत्स्यबीज उत्पादन करावे.

गोड्यापाण्यातील मत्स्य संवर्धनात कटला, रोहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सामान्य कार्प या कार्प जातीच्या माशांचे प्रामुख्याने उत्पादन केले जाते. त्यांच्या संवर्धनासाठी बोटुकली आकाराच्या बिजाची आवश्यकता असते. मत्स्य बोटुकलीचे संगोपन हे कमी कालावधीत लहान तसेच हंगामी तलावांचा वापर करुन मोठ्या प्रमाणात बीज उत्पादनासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो. कार्प जातीच्या माशांच्या बीजाचे वर्गिकरण हे मुख्यत: तीन भागामध्ये केले जाते यामध्ये मत्स्य जिरे (४-७ दिवसांचे, ५-७ मि.मी.), मत्स्य बीज (१५-२० दिवसांचे कार्प बीज, २०-२५ मि.मी.) आणि बोटुकली (२ ते ३ महिन्यांचे बीज, ८०-१०० मिमी). वयोगटानुसार, कार्प बीजांचे संगोपन दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतले जाते.

 • नर्सरी टप्पा: या टप्प्यात, मत्स्य बीजाचे संगोपण हे १५ ते २० दिवसांच्या कालावधीत घेतले जाते
 • संगोपन टप्पा: या टप्प्यात, मत्स्य बोटूकलीचे संगोपन हे २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत घेतले जाते.

कार्प मत्स्य बीजाच्या संगोपनासाठी तलावांचे योग्य परिमाण

परिमाण नर्सरी टप्पा संगोपन टप्पा
मातीचा तलाव सिमेंटची टाकी (मातीचा तलाव)
तलावाचे क्षेत्र ०.०२-०.१ हेक्टर ५०-१०० मी२ ०.०५-०.२ हेक्टर
तलावाच्या पाण्याची खोली  १.०-१.५ मीटर १.०-१.२ मीटर १.२-१.५ मीटर

 
कार्प मत्स्य बीज संगोपनाचे मुलभुत घटक
साठवणपूर्व तलावाची तयारी 

कार्प माशांचे मत्स्य बिजाच्या साठवणुकीपूर्वी, खालील दिलेल्या पद्धतींद्वारे संगोपन तलावाची योग्य प्रकारे तयार करावी:

 • जंगली मासे, जल वनस्पती, रोगकारक सूक्ष्म जीव, इत्यादी काढून टाकण्यासाठी तलावाच्या पाण्याच्या निचरा किंवा तलाव सुकवायला हवा.
 • पाण्याचा निचरा न होणाऱ्या तलावांमधील नको असलेल्या जलीय वनस्पतींचे व्यवस्थापन, शक्यतो लहान आकाराच्या तलावांमधून मनुष्यबळाने (मच्छर जाळी, हूक, दोरी, हाताने, इ.) तर मोठ्या आकाराच्या तलावांमधून यांत्रिक किंवा जैविक (गवत्या, सामान्य कार्प, तिलापिया इ. शाहाकारी मासे साठवून) पद्धतींचा अवलंब करु शकतो. त्याचप्रमाणे, जंगली मासे वारंवार जाळीने काढून टाकावेत किंवा मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी एक महिना आधी २००० ते २५०० कि.ग्रॅ./हे.-मी. मोहाच्या तेलाची पेंड वापरुन काढले जातात.
 • वैकल्पिकरित्या, शिकारी मासे काढण्यासाठी ब्लिचिंग पावडर @३५० किलो/हेक्टर-मीटर किंवा युरिया @१०० किलो/हेक्टर आणि ब्लीचिंग पावडर @१७५ किलो/हेक्टर यांच्या मिश्रणाचा उपयोग करुनहि या माशांचे व्यवस्थापन करु शकतो.
 • तलावाची माती आणि पाण्याचा सामु (पीएच) सुधारण्यासाठी चुन्याचा वापर करावा.

तलावामधील पाण्यामध्ये प्लवकांच्या (नैसर्गिक खाद्य) निर्मितीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा उपयोग 

तपशीलवर माहिती नर्सरी टप्पा संगोपन टप्पा
संगोपन कालावधी (दिवस) १५-२०  ६०-९०
भुईमूग/मोहरीच्या तेलाची पेंड (कि.ग्रा./हेक्टर) ७५० --
 शेणखत (कि.ग्रॅ./हेक्टर) २०० १०००
 सिंगल सुपर फॉस्फेट (कि.ग्रॅ./हेक्टर) ५० ३००
युरिया (कि.ग्रॅ./हेक्टर) - - २००
 खतांच्या वापराचे वेळापत्रक मत्स्य बीज साठवण्यापूर्वी २-३ दिवस आधी वरील प्रमाणातील अर्धा भाग प्राथमिक मात्रा म्हणून उपयोग करावा. उर्वरित मात्रा २-३ भागामध्ये विभागून त्याचा वापर करावा. बीज साठवणूकीच्या १५ दिवस आधी वरील प्रमाणातील एक तृतीयांश भाग प्राथमिक मात्रा म्हणून उपयोग करावा. उर्वरित दर पंधरवड्याच्या अंतराने प्लवकांच्या वाढीसाठी एक समान प्रमाणात वापर करावा.

टीप : संगोपन कालावधीमध्ये शेतकऱ्याने खतांची मात्रा ही पाण्याची गुणवत्ता आणि प्लवकांचे पाण्यातील प्रमाण यानुसार कमी-जास्त करावे.

 • खतांचा उपयोग केल्यानंतर जलिय किटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते, त्यांचे नियंत्रण नर्सरी तलावांमध्ये करण्यासाठी साबण-तेल यांचे मिश्रण अनुक्रमे १८ कि.ग्रॅ. साबण + ५६ कि.ग्रॅ. तेल/हेक्टर किंवा केरोसिन १००-२०० लि./हेक्टर किंवा डिझेल ७५ लि. + द्रव साबण ५६ मि.ली./ हेक्टर वापरून नियंत्रण करावे.
 •  संगोपन कालावधीमध्ये कार्प मत्स्य बिजाच्या जलद वाढीसाठी तलावाच्या पाण्यातील प्लवकांची घनता १-१.५ मिलि/५० लिटर राखावी. त्यासाठी खतांच्या वापरामध्ये योग्य तो फेरफार करून आणि यासाठी शेतकऱ्यांनी प्लवक जाळीचा वापर करावा.
 • तलावावर जाळीचे किंवा नायलॉनच्या धाग्याचे आच्छादन तयार करावे जेणे करून पक्ष्यांपासून (पाण कोंबडी, धिवर पक्षी, बगळे, इ.) मत्स्य बीजास होणारा उपद्रव रोखता येईल.

मत्स्य बीज साठवणुकी दरम्यानचे व्यवस्थापन 

 • नर्सरी तलावांमध्ये, कार्प जातीच्या जिऱ्याच्या एकच प्रजातीची साठवणूक करावी.
 • बोटुकली संगोपनात माशांच्या एकापेक्षा जास्त प्रजातींचे साठवणूक करू शकतो.
 • कार्प माशांचे बीज दिवसांच्या थंड वातावरणात (सकाळी किवा संध्याकाळी) तलावाच्या पाण्यात १० मिनिटे (नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी) बीज वाहतूक पिशवीसकट ठेवून नंतर तलावात हळूवारपणे सोडावे.

नर्सरी तलाव आणि संगोपन तलावातील मत्स्य बीज साठवणूक घनता

परिमाण नर्सरी टप्पा संगोपन टप्पा
मातीचा तलाव  सिमेंटची टाकी मातीचा तलाव
साठवणूक घनता (प्रति हेक्टर) ३-५ दशलक्ष मत्स्य जिरे  २०-३० दशलक्ष मत्स्य जिरे ३-४ लाख मत्स्य बीज
 

मत्स्य बीज साठवणीनंतरचे व्यवस्थापन 
मत्स्य बीज तलाव

 • कार्प माशांचे बीज साठवल्यानंतर, तलावातील पाण्याच्या गुणवत्तेची नियमितपणे तपासणी करावी.
 • पाण्याची गुणवत्ता आणि प्लवकांचे प्रमाण या आधारवर वर नमूद केलेल्या प्रमाणे विविध खतांच्या मात्रांचा वापर करावा.

पाण्याची गुणवत्ता 
मापदंड....................................इष्टतम प्रमाण
विरघळलेला प्राणवायू....................५ - ८ मिलि.ग्रॅ./लि.
पाण्याचा सामू (pH).......................७.५ - ८.३
एकूण अल्कलिनिटी.......................१०० - १२५ मिलि.ग्रॅ./लि.
पाण्याचे तापमान...........................२८ - ३० अंश सेल्सिअस.
पाण्याची पारदर्शकता.....................२५-३० सें.मी.
प्लवकांची घनता.............................१–१.५ मि.लि.

- डॉ. अजित चौधरी, ८३२९८७९५९३
(शास्त्रज्ञ,‍ क्षेत्रीय संशोधन केंद्र, केंद्रिय गोडेपाणी मत्स्य संवर्धन संस्था, विजयवाडा, आंध्र प्रदेश)
- डॉ. सचिन खैरनार, ८१९६०१३६३९
(सह. प्राध्यापक, गुरू अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)


इतर कृषिपूरक
जनावरांमध्ये दिसतो थंडीचा ताणतणावअचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून...
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...